जन्माष्टमीच्या दिवशी रणवीर आणि दीपिकाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, फोटो केले शेअर

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी इन्स्टा स्टोरीद्वारे आनंदाची बातमी दिली आहे

Updated: Aug 19, 2022, 10:49 PM IST
जन्माष्टमीच्या दिवशी रणवीर आणि दीपिकाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, फोटो केले शेअर  title=

बॉलीवूडमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी नुकतेच लग्न झालेल्या रणबीर आणि आलियाने (Ranbir Kapoor Alia Bhatt Pregnancy)  एक गुड न्यूज दिली होती. आलियाने प्रेग्नेंट असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली.अलीकडेच बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर (Bipasha Basu Karan Singh Grover Pregnancy) यांनीही ते पालक होणार असल्याची घोषणा केली.

त्यानंतर आता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण (Ranveer Singh Deepika Padukone) यांनीही एक आनंदाची बातमी दिली आहे. यासंदर्भातील फोटोही समोर आले आहेत.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण नुकतेच अलिबागमध्ये एक नवीन घर घेतले आहे ज्याचे फोटो दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

दोघांनी अलिबागच्या या घरात प्रवेश केला आहे. या घराच्या गृहप्रवेशाची पूजा ठेवली होती. यादरम्यान दोघांच्या कुटुंबीय उपस्थित होते.

रणवीर सिंहने त्याच्या इंस्टाग्रामवर गृह प्रवेश पूजाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणवीर आणि दीपिका पांढऱ्या पोशाखात हवन करताना दिसत आहेत.आणखी काही फोटोंमध्ये ते एकमेकांचे हात धरून आहेत.एका फोटोमध्ये ते घराचे गेट उघडताना दिसत आहे.

दरम्यान, रणवीर आणि दीपिकाच्या या बंगल्याची किंमत 22 कोटी आहे. मनी कंट्रोल नुसार, अलिबागमध्ये असलेल्या या मालमत्तेमध्ये पाच खोल्या आहेत. सध्या दीपिका आणि रणवीर मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या एका इमारतीत राहतात