close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

स्कूल चले हम! शालेय गणवेशातील दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल

दीपिका शाळेच्या गणवेशात शाळेबाहेरील स्ट्रीट फूड खाताना दिसत आहे.

Updated: Apr 21, 2019, 03:04 PM IST
स्कूल चले हम! शालेय गणवेशातील दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात दीपिका शाळकरी मुलीच्या गणवेशात दिसत आहे. हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यावर शाळेच्या गणवेशात असलेली दीपिका असल्याचे ओळखूही येत नाही. दिपिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिका सध्या 'छपाक' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. 'छपाक'चं शूटिंग सुरु झाल्यापासून चित्रपटाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये दीपिका वेगवेगळ्या अंदाजात दिसतेय. 

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओत दीपिका शाळेच्या गणवेशात आणखी एका मुलीसोबत शाळेबाहेरील स्ट्रीट फूड खाताना दिसत आहे. दीपिका उभी असल्याच्या मागे स्कूल बोर्डही दिसत आहे. निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा, ओढणी अशा गणवेशात ती खाताना दिसत आहे. 

'छपाक' चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. चित्रपटात दीपिका अॅसिड अॅटॅक पिडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. लक्ष्मीच्या बायोपिकमध्ये दीपिका मालती नावाची भूमिका साकारणार आहे. रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. 'छपाक' १० जानेवारी २०२० साली चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून दीपिका दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. 'छपाक' दीपिकाच्या के.ए एंटरटेन्मेंट बॅनरअंतर्गत पहिलाच चित्रपट असणार आहे.