घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांवर Deepika Padukone ने सोडलं मौन

'रणवीर गेल्या अनेक दिवसांपासून बाहेर आहे....', घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांवर दीपिकाचं मोठं वक्तव्य  

Updated: Oct 12, 2022, 02:19 PM IST
घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांवर Deepika Padukone ने सोडलं मौन title=

Deepika  - Ranveer : अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer singh) हे बॉलिवूडमधील पॉवर  कपलपैकी (Power couple of Bollywood) एक आहेत. दीपिका आणि रणवीर (Deepika  - Ranveer) एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत. अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं आणि सात जन्मासाठी एक झाले. महत्त्वाचं म्हणजे दीपिका आणि रणवीर चाहत्यांना देखील कायम कपल गोल्स (couple goals) देत असतात. पण काही दिवसांपूर्वी दोघं विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. (Deepika  - Ranveer divorce)

पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दीपिकाने घटस्फोटाबद्दल (Deepika padukone on divorce) रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. रणवीरने अनेकवेळा दीपिकावरील प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. (deepika ranveer made for each other)

...म्हणून दीपिका रणवीर यांचा हनिमून काळ असणार कमी

दीपिका सार्वजनिक ठिकाणी तिच्या नात्यावर कमी बोलताना दिसते. पण अभिनेत्रीच्या डोळ्यात रणवीरबद्दल असलेली भावना स्पष्टपणे दिसून येते. दरम्यान दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यामुळे चाहते खूपच नाराज झाले. ( deepika ranveer wedding)

घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांवर दीपिका अखेर म्हणाली, 'मी गेल्या काही दिवसांपासून शुटिंगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. शिवाय रणवीर देखील कामासाठी अनेक दिवसांपासून बाहेर आहे, पण आता रणवीर घरी येणार आहे आणि मला पाहिल्यानंतर तो अत्यंत आनंदी होईल.' असं देखील दीपिका म्हणाली. (deepika ranveer love story)