cannes मधला दीपिकाचा पहिला लूक समोर....ग्लॅमरस लूकनं चाहते घायाळ

फ्रेंच रिव्हिएरामधून दीपिकाचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती कान्स ज्युरीसोबत दिसत आहे.

Updated: May 17, 2022, 11:14 AM IST
cannes मधला दीपिकाचा पहिला लूक समोर....ग्लॅमरस लूकनं चाहते घायाळ title=

मुंबईः बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून हजेरी लावणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी दीपिका फ्रेंच रिव्हिएरा येथे पोहोचली आहे.

फ्रेंच रिव्हिएरामधून दीपिकाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात ती कान्स ज्युरीसोबत दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीपिकाचे हे फोटो तिच्या सर्व फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये दीपिकाचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.

दीपिका कान्स फेस्टिव्हलच्या ज्युरींसोबत डिनर करण्यासाठी आली होती. यादरम्यान, अभिनेत्रीने व्हाइट बेसमध्ये मल्टी कलर वर्क केलेल्या एका लाँग टॉप परिधान केला आहे. या टॉपसह, अभिनेत्रीने तपकिरी रंगाचे लांब बूट घातले आहेत ज्यामुळे ती अधिक स्मार्ट दिसत आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 17 मे पासून सुरू होत आहे. या वर्षी व्हिन्सेंट लिंडन यांना ज्युरीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.