दीपिका पदुकोण प्रेग्नेंट? स्वतः दीपिकाने केला खुलासा

चाहत्यांना देखील उत्सुकता 

Updated: Jan 7, 2020, 11:35 AM IST
दीपिका पदुकोण प्रेग्नेंट? स्वतः दीपिकाने केला खुलासा

मुंबई : नुकताच दीपिका पदुकोणने आपला 34 वा वाढदिवस साजरा केला आहे. दीपिका पदुकोणचा आगामी सिनेमा 'छपाक' 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या दीपिका व्यस्त आहे. अशाच एका कार्यक्रमात दीपिकाला तिच्या प्रेग्नेसीबद्दल विचारण्यात आलं. यावर दीपिकाने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. 

दीपिकाने विचारलेल्या प्रश्नाला अतिशय मजेशीर उत्तर दिलं आहे. दीपिका म्हणते की,'मी तुम्हाला गरोदर दिसत आहे का?' दीपिका एवढ्यावरच थांबली नाही तर पुढे म्हणाली की,'प्रेग्नेंट होण्याअगोदर मी तुम्हाला विचारेन. तुम्ही परवानगी दिली तरच मी फॅमिली प्लानिंगचा विचार करेन. जर मी गरोदर राहिलेच तर तुम्हाला नऊ महिन्यांत समजेलच.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#deepikapodukone with #laxmiagarwal and her sweet daughter Pihu yesterday in Lucknow #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

काही दिवसांपूर्वी दीपिकाने आपल्याला आणि रणवीरला लहान मुलं खूप आवडत असल्याचं सांगितलं. पण सध्या याबाबत काही विचार केलेला नाही. दीपिका रविवारी रणवीर सिंहसोबत लखनऊमध्ये पोहोचली. तिचा वाढदिवस अगदी मुंबईच्या विमानतळापासूनच सुरू झाला होता. तिथे तिने केक कापून वाढदिवस साजरा केला. 

दीपिका सध्या तिच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लखनऊमधील दोन ऍसिड पीडित तरूणांचा समावेश या सिनेमांत आहे. या प्रमोशन दरम्यान लक्ष्मी अग्रवाल आणि इतर तरूणी उपस्थित होत्या.