दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशची आज चौकशी

सर्वप्रथम ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने करिश्माला समन्स जारी केले होते.  

Updated: Nov 4, 2020, 12:52 PM IST
दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशची आज चौकशी  title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलचं तापलं आहे. याप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशची बुधवारी चौकशी होणार आहे. ड्रग्स प्रकरणी चॅटसमोर आल्यानंतर एनसीबी तिच्या विरोधात कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी करिश्माच्या घराची झडती घेतली होती. तेव्हा तिच्या घरातून ड्रग्स हस्तगत करण्यात आले. त्यानंतर एनसीबीने करिश्माला समन्स पाठवले होते. परंतु पहिल्यांदा समन्स पाठवल्यानंतर ती चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही. 

त्यामुळे तिला दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले. अखेर आज करिश्माची चौकशी होत आहे. NCBने तिची आई मिताक्षरा पुरोहित आणि क्वान टॅलेंट मॅनेजरकडे समन्स पाठवले. करिश्माने तिच्या आईचा पत्ता दिल्याने एनसीबीने करिश्माच्या आईला समन्स पाठविले. करिश्मा क्वान टॅलेंट कंपनीमध्ये काम करत होती. क्वान कंपनीत ती काम करत असल्यामुळे कंपनी तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सुचित करेल म्हणून कंपनीकडे देखील समन्स पाठविले होते.

ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने करिश्माला समन्स जारी केले होते. परंतु ती चौकशीसाठी हजर राहिली नाही. ती अद्यापही गायब आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आत्महत्या प्रकरणी सध्या एनसीबी तपास करत आहे. चौकशीसाठी करिश्माला समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र ती गायब असल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं होतं.