पोलीस अधिकाऱ्याकडून बिकनी फोटोंची मागणी; अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट

पोलीस अधिकाऱ्यानेचं केली अभिनेत्रीकडून बिकनी फोटोंची मागणी

Updated: Sep 14, 2021, 11:35 AM IST
पोलीस अधिकाऱ्याकडून बिकनी फोटोंची मागणी; अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट  title=

मुंबई : सध्या सोशल मीडियाचं जाळ सर्वत्र पसरलेलं आहे. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण सोशल मीडियाची मदत घेतो. काही आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या अनुभवांबद्दल व्यक्त होतात, तर काही आयुष्यातील दुःख व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून देतात. पण काही लोक सोशल मीडियाचा वाईट वापर करतात. ज्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. असचं काही झालं आहे एका टीव्ही अभिनेत्रीसोबत. एका पोलीस अधिकाऱ्याने  अभिनेत्रीकडून अशा गोष्टीची मागणी केली ज्यामुळे अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कुमकुम भाग्य' मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणारी अभिनेत्री शिखा सिंहकडे  पोलीस अधिकाऱ्याने धक्कादायक मागणी केली. दरम्यान 2018 साली  शिखाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तेव्हा शिखाचं लक्ष एका कमेन्टकडे गेलं. ही कमेन्ट जगदीश गुंजे यांनी केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'सुंदर फोटो.. पण नव्या वर्षासाठी भेटवस्तू म्हणून काही बिकनी आणि मायक्रो मिनीमधील फोटो पोस्ट कर...' त्यानंतर शिखा संतापली. पण अशी कमेन्ट करणारा व्यक्ती एक पोलीस अधिकारी असल्याचं शिखाला कळालं तेव्हा तिचा पारा चढला. शिखाने सर्वांना पुरावा दाखविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचा अकाउंट आणि कमेन्टचा स्क्रिनशॉर्ट  पोस्ट केला आहे. 

सध्या सोशल मीडियावर शिखाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. शिखाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यापासून ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. शिखाने 'लेफ्ट राइट लेफ्ट’ मालिकेच्या माध्यमातून अभिनयास सुरूवात केली त्यानंतर ‘न आना इस देस लाडो’, ‘ससुराल सिमर का’ आणि ‘लाल इश्क’ मालिकेत  तिने महत्त्वाची भूमिका साकारली.