नोरा फतेहीचं शॉर्ट्समध्ये हॉट वर्कआऊट; चाहते म्हणाले...

वर्कआऊट करताना नोराच्या हॉटलूक 

Updated: Sep 14, 2021, 10:04 AM IST
नोरा फतेहीचं शॉर्ट्समध्ये हॉट वर्कआऊट; चाहते म्हणाले... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कायम तिच्या फिटनेस आणि भन्नाट डान्समुळे ओळखली जाते. नोरा नेहमी तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. फिटनेस फ्रिक अभिनेत्री नोरा सोशल मीडियावर वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना फिट राहण्याचं आवाहन करत असते. आता  देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये तिने नियॉन रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. त्याचप्रमाणे काळ्या रंगाची ट्यूब ब्रा घातली आहे. फोटोंमध्ये नेहा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचं कौतुक होत आहे. फिट राहण्यासाठी ती कायम जीममध्ये मेहनत करत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोरा फतेहीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने 'दिलबर' आणि 'गर्मी' गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मन जिंकलं आहे. नुकताचं तिचा 'भुजः द प्राईड ऑफ इंडीया' प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील नोराच्या अभिनयाने आणि डान्सने सर्वांच्या मनात राज्य केलं. चित्रपटात अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री सोनाक्षीने देखील मुख्य भूमिका बजावली आहे.