देवेंद्र यांनी लिहिलं आणि अमृता फडणवीसांनी गायलं, 'देवाधी देवा' गाणं तुम्ही ऐकलंत का?

या गाण्याचे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहेत. या गाण्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

Updated: Mar 8, 2024, 06:00 PM IST
देवेंद्र यांनी लिहिलं आणि अमृता फडणवीसांनी गायलं, 'देवाधी देवा' गाणं तुम्ही ऐकलंत का? title=

Amruta Fadnavis New Song : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गाण्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता नुकतंच अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आज 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीनिमित्त हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. देवाधी देवा असे या गाण्याचे बोल आहेत. 

अमृता फडणवीसांनी गायलं महामृत्यूंजय मंत्र

अमृता फडणवीस यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'देवाधी देवा' या गाण्याची झलक दाखवली आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांनी महामृत्यूंजय मंत्र गायले आहे. या पोस्टला कॅप्शन देताना अमृता फडणवीसांनी त्यांनी शंकर महादेवन, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

आणखी वाचा : मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की...; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

देवेंद्र फडणवीसांनी लिहिले गाण्याचे बोल

गेल्या काही दिवसांपासून देवाधी देव महादेव गाण्याची प्रचंड चर्चा रंगली होती. शिवसंभो, नीलकंठ तू अनादी....देवाधी देव महादेव...असे या गाण्याचे बोल आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेले देवाधी देवा हे गाणे प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहेत. या गाण्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या गाण्याला 22 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

आणखी वाचा : 'बाईपण'नंतर आता 'आईपण भारी देवा'! केदार शिंदेंकडून नव्या चित्रपटाची घोषणा

अमृता फडणवीस यांचं 2024 मधील पहिलं गाणं 

अमृता फडणवीस यांचं 2024 या वर्षातील हे पहिलं गाणं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर आहेत. त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘आज मै मूड बना लिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.