'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्रीने 100 पेक्षा जास्त मुलांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात

'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्रीच्या प्रेमात 100 मुलं, नक्की काय आहे प्रकरण?  

Updated: Dec 3, 2021, 01:04 PM IST
'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्रीने 100 पेक्षा जास्त मुलांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात

मुंबई : 'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्री सोनारिका भदोरिया आज टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकेच्या माध्यमातून सोनारिकाला एक खास आणि वेगळी ओळख मिळाली. सोनारिका तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. प्रेक्षकांनी तिला माता पार्वती किंवा सुसंस्कृत सून म्हणून अनेक मालिकांमध्ये झळकली. कायम साध्या आणि सभ्य भूमिकेत असलेली सोनारिका खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि हॉट आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 29 वर्षीय सोनारिकाने आतापर्यंत 137 हून अधिक मुलांचे प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. एका मुलाखतीत, अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला होता की तिने आतापर्यंत 137 पेक्षा जास्त लग्ने नाकारली आहेत.

सध्या हे वय लग्न करण्याचे नसून काम करण्याचे आहे, असे सोनारिकाचं मत आहे. सध्या तिला इंडस्ट्रीत वेगळे स्थान मिळवायचे आहे. टीव्ही मालिकांनंतर आता सोनारिकावा बॉलिवूडमध्ये झलक दाखवायची आहे

सोनारिका भदोरिया ही प्रसिद्ध तेलुगु स्टार आहे. तिने 'जादुगडू', 'स्पीदुन्नोडू', 'एदो रख आओ राख' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. 'देवों के देव महादेव'मध्‍ये पार्वतीच्या भूमिकेसाठी अजूनही तिला ओळखली जातं. 

सोनारिका शेवटी 2019 मध्‍ये 'इश्क में मरजावां'मध्‍ये दिसली होती, ज्यामधेय तिने नेत्रा शर्माची भूमिका केली होती. मात्र 2019 पासून तो टीव्ही स्क्रीनवरून दूर आहे.