माझी लायकी नाही... , सारा अली खानवर का आली असं म्हणण्याची वेळ?

साराची एक मुलाखत सर्वांच्या नजरा वळून जात आहे

Updated: Dec 3, 2021, 12:01 PM IST
माझी लायकी नाही... , सारा अली खानवर का आली असं म्हणण्याची वेळ?
सारा अली खान

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. सारानं तिच्या कलेच्या बळावर चाहता वर्ग निर्माण केला. 

आतापर्यंत काही प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधीही तिला मिळाली. पण, असं काय झालं की साराला थेट आपल्या लायकीविषयी वक्तव्य करावं लागलं? 

सध्या सैफची ही लेक तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ती विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसत आहे.

अशातच साराची एक मुलाखत सर्वांच्या नजरा वळून जात आहे. जिथं तिनं आपल्याला नेमका कसा जोडीदार हवा इथपासून आपल्या लग्नावरही चर्चा केली आहे. 

आगामी 'अतरंगी रे' या चित्रपटातून सारा रिंकू हे पात्र साकारताना दिसणार आहे. पण, मुळात रिंकू आणि सारामध्ये मात्र प्रचंड फरक असल्याचं तिनं सांगितलं. 

रिंकूची चर्चा झाली, त्यावेळी आपलं उदाहरण देत सारा म्हणाली, 'आईपासून दूर जाण्याची माझी लायकी नाही. कुठेही पळून गेली तरीही घरी परतायचं आहेचय मी आईच्या सल्ल्याशिवाय मुलाखतही देत नाही. आईच माझं सर्वकाही सांभाळते, असं सारा म्हणाली.'

लग्नाबाबत सांगताना सारा म्हणाली, की ती एका सर्वसामान्य व्यक्तीशी लग्न करणं पसंत करेल. 

'मी कधीच आईपासून दूर जाऊ शकत नाही. त्यामुळं अशा माणसाशी लग्न करेन जो माझ्यासोबत असेल आणि माझ्या आईच्याही सोबत असेल', असं ती म्हणाली. 

आईपासून केव्हाही दुरावा येऊ देणार नसल्याचं म्हणत ती माझ्यासाठी सर्वस्व आहे असं सारानं मोठ्या आग्रही स्वरात सांगितलं.