'मी काय रस्त्यावर...', 150 कोटींचा आलिशान बंगला विकत घेतल्याने ट्रोल करणाऱ्यांना धनुषचं सडेतोड उत्तर, 'मी 20 वर्षं...'

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने (Dhanush) चेन्नईत 150 कोटींचा आलिशान बंगला विकत घेतला आहे. हा बंगला रजनीकांत (Rajinikanth) आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Former Tamil Nadu Chief minister J Jayalalithaa) यांच्या शेजारी आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 25, 2024, 03:06 PM IST
'मी काय रस्त्यावर...', 150 कोटींचा आलिशान बंगला विकत घेतल्याने ट्रोल करणाऱ्यांना धनुषचं सडेतोड उत्तर, 'मी 20 वर्षं...' title=

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने (Dhanush) चेन्नईत 150 कोटींचा आलिशान बंगला विकत घेतल्याने चर्चेचा विषय झाला आहे. धनुषने नव्या घराची पार्टी ठेवल्यानंतर गतवर्षी तिथे वास्तव्यास गेला होता. हा बंगला रजनीकांत (Rajinikanth) आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Former Tamil Nadu Chief minister J Jayalalithaa) यांच्या शेजारी आहे. धनुषने इतकं महागडं घर विकत घेण्यावरुन चर्चा रंगली असताना अभिनेत्याने त्यावर भाष्य केलं आहे. तसंच आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी सांगताना उच्चभ्रू वस्तीमध्ये घर का घेतलं? याचं कारण सांगितलं आहे. 

आपला आगामी चित्रपट रायनच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात धनुषने सांगितलं की, "जर मला मी पोस गार्डनमध्ये घर विकत घेणं हा इतका मोठा चर्चेचा विषय होईल याची मला कल्पना असती तर मी त्यापेक्षा एक छोटं अपार्टमेंट विकत घेतलं असतं. माझ्यासारख्या व्यक्तीने पोस गार्डनमध्ये घर विकत घेऊ नये का? रस्त्यावर जन्माला आलेल्या व्यक्तीने आयुष्याचा शेवट होईपर्यंत तिथेच राहावं का?".

"पोस गार्डनमध्ये घर खरेदी करण्यामागे एक छोटासा किस्सा आहे. एके दिवशी, जेव्हा मी 16 वर्षांचा होतो आणि माझ्या मित्रासोबत बाईकवर फिरत होतो, तेव्हा मला थलैवरचे (रजनीकांत) घर पाहण्याची इच्छा होती. वाटसरूं आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही त्यांचं घर पाहिलं. आम्ही ते घऱ आनंदाने पाहिलं आणि परत निघालो. बाईकवर परतत असताना दुसऱ्या बाजूला खूप गर्दी होती. रजनीकांत यांचं घर दुसऱ्या बाजूला ही गर्दी पाहून मी हे घर कोणाचं आहे असं विचारलं. त्यावर लोकांनी हे जयललिता यांचं घर आहे असं सांगितलं. त्या क्षणी माझ्या मनात पोस गार्डनमध्ये एक लहान घर घेण्याची इच्छा फुलली," असा खुलासा धनुषने केला. 

"त्यावेळी, आम्ही खूप संघर्ष करत होतो. जर थुल्लूवधो इलामाई (ज्यातून धनुषने अभिनेता म्हणून पदार्पण केलं आणि त्याचे वडील कस्तुरी राजा यांनी दिग्दर्शन केलं तसंच त्याचा भाऊ सेल्वाराघवनने कथा लिहिली होती) यशस्वी झाला नसता, तर आम्हाला रस्त्यावर राहावं लागलं असतं. 20 वर्षे काम करून मी पोस गार्डनमध्ये जे घर विकत घेतले, ते धनुषने त्या 16 वर्षीय व्यंकटेश प्रभूला (त्याचे जन्माचे नाव) भेट म्हणून दिलं आहे," असं तो म्हणाला. 

धनुष सध्या 'रायन' चित्रपटात व्यस्त आहे. चित्रपटात तो गँगस्टरच्या भूमिकेत आहे. त्यानेच हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, मुख्य भूमिकेत आहे. तसंच निलावुक्कु एनमेल एन्नाडी कोबाम या रोम-कॉममध्ये काम करत आहे. याशिवाय, धनुष अरुण माथेश्वरन दिग्दर्शित बायोपिकमध्ये संगीतकार इलैयाराजा यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. रश्मिका मंदान्ना सह-कलाकार असलेल्या कुबेरमध्येही तो दिसणार आहे.