ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू

उपचार सुरू 

Updated: Oct 9, 2019, 12:30 PM IST
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना मुंबईतील खार रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांना डेंग्यू झाला असून पुढील 3 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. डेंग्यूच्या आजारामुळे धर्मेंद्र यांना रूग्णालयात दाखल केलं होतं. सोमवारी संध्याकाळी रूग्णालयातून घरी आणण्यात आलं आहे.

तब्बेत ठीक नसल्यामुळे धर्मेंद्र सध्या मुंबईत आपल्या कुटुंबासोबतच राहत आहेत. 83 वर्षांचे धर्मेंद्र आपला सर्वाधिक वेळ हा लोणावळ्यात फार्महाऊसवर घालवतात. धर्मेंद्र येथे स्वतः शेती करतात आणि गुरं सांभाळतात. सुत्रांना विचारलेल्या माहितीनुसार, आता ते काही दिवस मुंबईत राहणार आहेत. तब्बेत ठिक नसल्यामुळे मुंबईतच राहणार. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Love  you all for your loving  response . My answer to you all Jeete raho Khush raho 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam) on

धर्मेंद्र सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव असतात. काही दिवसांपूर्वी ते नातू करण देओलच्या "पल पल दिल के पास' सिनेमाच्या प्रमोशनकरता टीव्ही शोजमध्ये जात होते. एका रिऍलिटी शोमध्ये आपले सुरूवातीचे फोटो बघून ते खूप इमोश्नल झाले. हा सिनेमा अभिनेता सनी देओलनेच दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही. 

धर्मेंद्र यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, मी जेव्हा पण दुःखी असतो तेव्हा मी त्यांची गाणी ऐकतो आणि सगळं दुःख कमी होऊन जातं. धर्मेंद्र यांच्या सिनेमांनी आजही प्रेक्षकांची करमणूक होते. सिनेमातून थोडे दूर झालेले धर्मेंद्र लोणावळ्यात शेती करतात.