'मी माझा मोठा भाऊ गमावला', दिलीप कुमार यांच्या आठवणीत धर्मेद्र यांना कोसळलं रडू

ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार आता आपल्यात नाहीत

Updated: Jul 17, 2021, 06:53 PM IST
'मी माझा मोठा भाऊ गमावला', दिलीप कुमार यांच्या आठवणीत धर्मेद्र यांना कोसळलं रडू title=

मुंबई : ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार आता आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत. 7 जुलै रोजी दिलीप कुमार यांनी जगाला निरोप दिला. त्यांच्या निधनाने चित्रपट जगतातील सर्व स्टार त्यांच्या घरी पोहोचले आणि दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. याच भागात दिलीपकुमार यांचे जिवलग मित्र आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्रही त्यांच्या घरी पोहोचले.

दिलीप साहबांच्या शेजारी बसलेल्या धर्मेंद्र यांचे अनेक फोटोही समोर आले होते. दिलीप साहब यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत धरम पाजी यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, आज मी माझा भाऊ गमावला आहे. आता धर्मेंद्र रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल 12' मध्ये दिसणार आहेत. शोच्या या भागातील दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र असं सांगताना दिसत आहे की, मी अजून त्यांच्या धक्क्यातून सावरलो नाही आहे.

या प्रोमोमध्ये असंही दाखवण्यात आलं आहे की, सगळे स्पर्धक धर्मेंद्र यांच्यासमोर दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहत आहेत. धर्मेंद्र त्यांच्या आठवणी बोलताना स्वत:चे अश्रू ते रोखू शकले नाहीत. ते भावनिकतेने म्हणाले की, 'मी अद्याप धक्क्यातून सावरलो नाही. हे बरं झालं नाही ते माझा जीव होते. '

धर्मेंद्र पाजी पुढे म्हणाले, 'मी माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट यांचाच पाहिला होता आणि त्यांचा हा सिनेमा पाहून मला असं वाटलं की, मी पण यांच्याप्रमाणे  इंडस्ट्रीत जायला हवं आणि मलाही त्यांच्यासारखं प्रेम मिळावं. अशी माझी इच्छा आहे की, यानंतर आमची भेट देखील झाली. मलाही खूप प्रेम मिळू लागलं. खूप प्रेम मी सांगू शकत नाही.'

धर्मेंद्र पुढे म्हणाले, 'आजही बरीच उत्तम कलाकार आहेत, पण दिलीप साहबपेक्षा मला आणखी काही दिसत नाही.  मी फक्त माझ्या श्रद्धांजली अर्पण करतो, त्याना स्वर्गात आशीर्वाद मिळावा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

धर्मेंद्र यांनी यापूर्वी दिलीप साहबची आठवण करत ट्विट केलं होतं आणि लिहिलं होतं की, 'मित्रांनो, दिलीप साहब यांच्या निधनाने आपल्या सर्वांना भावूक केलं आहे. ते एक उत्कृष्ट कलाकार आणि एक चांगला माणूस होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ते गेले आहेत, त्यांच्या आठवणी जाऊ शकणार नाहीत.'