'या' अभिनेत्रीला जवळ घेण्यासाठी धर्मेंद्र यांची Setting, स्पॉटबॉयला पैसे दिल्यानंतर...

स्पॉटबॉयच्या मदतीने प्रसिद्ध अभिनेत्रीला जवळ घेण्यासाठी धर्मेंद्र यांची योजना  

Updated: Sep 17, 2022, 10:19 AM IST
'या' अभिनेत्रीला जवळ घेण्यासाठी धर्मेंद्र यांची Setting, स्पॉटबॉयला पैसे दिल्यानंतर...  title=

मुंबई : आज अभिनेते धर्मेंद्र यांना  कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याचे सिनेमे, डायलॉग आणि डान्स कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहिला. एवढंच नाही तर, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या. बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी कायमच चर्चेत राहिली आहे. ज्यांच्या प्रेम कहाणीचे किस्से आजही चर्चेचा विषय ठरतात. अभिनेत्री हेमा मालिनी त्यांच्या काळातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कुमार, जितेंद्र ते संजीव कुमार यांच्यासोबतच त्या काळातील सर्व कलाकार हेमा मालिनी यांच्यावर फिदा होते. पण अखेर हेमा मालिनी यांनी जोडीदार म्हणून धर्मेंद्र यांची निवड केली. 

अभिनेत्रीला मिठी मारण्यासाठी धर्मेंद्र यांनी केली अशी सेटिंग

धर्मेंद्र आणि हेमा यांचा 'शोले' सिनेमा आजही चाहते तितक्याचं आवडीने पाहतात. सिनेमा शूट होत असताना अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या आजही चर्चेत आहे. त्यामधील एक म्हणजे, जेव्हा सिनेमात हेमा बंदूक कशी चालवायची शिकत होत्या आणि त्यासाठी धर्मेंद्र त्यांना जवळत घेतात.

धर्मेंद्र यांना जेव्हा या सीनबद्दल कळले तेव्हा त्यांनी स्पॉटबॉयसोबत एक योजना बनवली की शूटिंगदरम्यान त्यांच्याकडून पुन्हा-पुन्हा चुका होतील, त्यामुळे या सीनचे शूटिंग अनेक रिटेकमध्ये पूर्ण होईल. ज्यामुळे धर्मेंद्र यांना हेमा यांच्या जवळ राहण्याची संधी मिळेल. 

अनेक रीटेक केल्यानंतर सीन चित्रित करण्यात आला. त्यावेळी या कामासाठी धर्मेंद्र यांनी स्पॉटबॉयला 2 हजार रुपये दिले होते. अखेर धर्मेंद्र यांनी रेखा यांनी लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. 

रिपोर्टनुसार, वारंवार रिटेक दिल्यामुळे हेमा मालिनी संतापल्या होत्या. जेव्हा त्यांना धर्मेद्र यांच्या योजनेबद्दल कळाल तेव्हा त्या आनंदी झाल्या. त्यनंतर धर्मेंद्र यांचं प्रेम हेमा यांनी स्वीकारलं. 1980 मध्ये दोघांनी लग्न केलं.