Krishna Janmashtami 2021 : आठवतोय का हा नटखट चेहरा? आज 'इतकं' बदललंय हे रुप

मैय्या..... असं म्हणताना तिनं साकारलेलं तान्हुल्या कृष्णाचं रुप आजही अनेकांच्या मनाचा ठाव घेतं   

Updated: Aug 30, 2021, 03:44 PM IST
Krishna Janmashtami 2021 : आठवतोय का हा नटखट चेहरा? आज 'इतकं' बदललंय हे रुप title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  कृष्णाचं रुप प्रत्येकाच्या मनावर वेगळी छाप सोडतं. नटखट रुपापासून महाभारतातील अर्जुनाला उपदेश करणाऱ्या कृष्णापर्यंकत प्रत्येत वेळी या दैवी रुपानं सर्वांना संकटातून तारलं. अशा या तान्हुल्या कृष्णाच्या लीला आणि पुढे त्याच्याकडून झालेले चमत्कार या साऱ्यावर भाष्य करणारी एक मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

'जय श्री कृष्ण' असं त्या मालिकेचं नाव. कृष्णजन्माष्टमीच्या (Krishna Janmashtami 2021) निमित्तानं जेव्हा या सुंदर रुपाचं चिंतन केलं जातं तेव्हा ही मालिकाही आठवल्यावाचून राहत नाही. या मालिकेमध्ये बाळकृष्णाच्या रुपानं तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. 

अनेकांना ही भूमिका एक लहान मुलगा साकारतोय असं वाटलं, पण तसं नव्हतं. ही भूमिका साकारली होती, धृती भाटिया या बालकलाकारानं. धृतीनं या एका भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. अनेक वर्षांनंतर जेव्हा आता धृती कोणासमोर येते तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यामध्ये झालेले बदल पाहता, प्रथमदर्शनी हीनंच कृष्ण साकारलेला, यावर विश्वास ठेवण्यासही वेळ जातो. 

जय श्री कृष्ण या मालिकेच्या वेळी धृती अवघ्या 3 वर्षांची होती. कृष्णाच्या भूमिकेनंतर धृती, 'इस प्यार को क्या नाम दूँ', 'माता की चौकी' या मालिकांमध्येही झळकली होती. सध्या ती या मालिका जगतापासून दूर असून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे. असं असलं तरीही येत्या काळात धृती प्रेक्षकांना कोणत्या रुपात दिसणार हा कुतूहलाचा प्रश्न मात्र कायम उपस्थित केला जातो.