लग्नानंतर अभिनेत्रीचं राजेशाही थाटात स्वागत

असा थाट कधी पाहिलाय का? 

Updated: Nov 14, 2019, 12:48 PM IST
लग्नानंतर अभिनेत्रीचं राजेशाही थाटात स्वागत
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : लग्नसोहळ्याचा थाट हा कायमच राजेशाही असावा असं अनेकांचं स्वप्न असतं. अर्थात त्याला काही अपवादही ठरतात. मुळात हा राजदेशाही थाट सर्वांच्याच नशीबी येतो असं नाही. मग, इव्हेंट मॅनेजर आणि इतर काही मार्गांनी हे तात्पुरतं 'राजे-रजवाडे'पण लग्नसोहळ्यांमध्ये सर्रास पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला या राजेशाही थाटाने लक्ष वेधलं आहे, कारण एका अभिनेत्रीला खऱ्याखुऱ्या शाही स्वागताचं साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे. 

'डान्स इंडिया डान्स' या रिऍलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली रेवाची राजकुमारी मोहिना कुमारी सिंह हिची अखेर पाठवणी (बिदाई) करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातील भव्य विवाहसोहळ्यानंतर या मोहिना आणि तिचा पती सुयश रावत यांनी मित्रपरिवारासाठी एका स्वागत समारंभाचं म्हणजेच रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांच्याही खास मित्रमंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. 

 
 
 
 

A post shared by Teammohenasingh (@teammohenasingh) on

खरीखुरी राजकुमारी आणि तिच्या पतीची एक झलक पाहण्यासाठी यावेळी जनतेने अक्षरश: गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. जनतेच्या मनात आपल्याप्रती असणाऱ्या या प्रेमाचा स्वीकार करत मोहिना आणि तिच्या पतीने अभिवादन करत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी त्यांच्यावर पुष्पवर्षावही करण्यात आला. एका अनोख्या वातावरणात मोहिना आणि तिच्या पतीवर असंख्य शुभेच्छांचाही वर्षाव त्यावेळी झाला. यावेळी हे नवविवाहित दाम्पत्य पारंपरिक वेशात पाहायला मिळालं.