फडणवीसांनी लिहीलेलं आणि त्यांच्या 'सौ'नी गायलेलं गाणं ऐकलं का?

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक मा.मुख्यमंत्री यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या गाण्याला प्रेक्षक नेहमीच पसंती देतात. आता नुकतंच त्यांचं नवंकोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Updated: Feb 5, 2024, 11:56 AM IST
फडणवीसांनी लिहीलेलं आणि त्यांच्या 'सौ'नी गायलेलं गाणं ऐकलं का? title=

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या गाण्याची वाट पाहत होते. मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकतीच अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुख्य म्हणजे हे गाणं देवेंद्र फडणवीस यांनी लिहीलं आहे. तर या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे.  हे गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अवघ्या काही वेळातच गाण्याला प्रेक्षकांनी पसंती देण्यास सुरुवात केली आहे.

सध्या देवेंद्रजी आणि अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 'राम नाम' असं देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या गाण्याचे नाव आहे. नुकताच अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोबळा मोठ्या थाटामाठात पार पडला. 'राम नाम' या गाण्याचा उमेश जोशी, विजय धुरी, जनार्दन धात्रक, संतोष बोटे, यश कुलकर्णी, यशद घाणेकर, सौरभ वखारे, विदित पाटणकर, प्रगती जोशी, आरोही म्हात्रे, मृण्मयी दडके, मानसी परांजपे, शमिका भिडे, शरयु राजकुमार दाते, राजकुमार चव्हाण यांनी कोरस गायला आहे. अवघ्या काही वेळातच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गाण्यावर युजर्सच्या कमेंट्स
अमृता फडणवीस यांनी गाण्याचा व्हिडीओ शेअर करत व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,  ''अजय अतुल यांच्या मनमोहक रचनेसह देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भजन ‘राम नाम’ चा एक भाग होताना आनंद झाला. खाली दिलेल्या लिंकवर ही मधुर रचना ऐका'' याचबरोबर अमृता यांनी कॅप्शनमध्ये एक लिंकही शेअर केली आहे. अनेकांनी या गाण्याचं कौतुक केलं आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, मराठित का नाही लिहीलं ? तर अजून एकाने लिहीलंय, खूपच छान. तर अजून एकजण म्हणतोय, खूप छान मॅडम. तर अनेकांनी जय श्री राम अशी कमेंट केली आहे. झी म्युझिक कंपनी या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या राम नाम या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. याआधीही अमृता फडणवीस यांनी बरीच गाणी गायली आहे. अमृता फडवीस यांना गायनाची खूप आवड आहे. नेहमीच प्रेक्षक त्यांच्या गाण्याला पसंती देत असतात. आता प्रेक्षक त्यांच्या ‘राम नाम’या गाण्यालाही चांगलीच पसंती देत आहेत.