'दिल चाहता हैं' फेम अभिनेत्याचं निधन; महिन्याभरापुर्वीच आलेली लोकप्रिय वेबसीरिज, शाहरूखसोबतही काम

Rio Kapadia : बॉलिवू़ड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ अभिनेते रिओ कपाडिया यांचे निधन झाले असून मनोरंजनविश्वात त्यांच्या या बातमीनं हळहळ व्यक्त केली जाते आहे. त्यांनी दिल चाहता हैं या चित्रपटातून भुमिका केली होती. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 14, 2023, 05:16 PM IST
'दिल चाहता हैं' फेम अभिनेत्याचं निधन; महिन्याभरापुर्वीच आलेली लोकप्रिय वेबसीरिज, शाहरूखसोबतही काम  title=
dil chahta hai actor rio kapadia passed away at the age of 66

Rio Kapadia : मनोरंजनविश्वातून धक्कादायक बातमी समोर येते आहे. दिल चाहता हैं फेम ज्येष्ठ अभिनेते रिओ कपाडिया यांचे वयाच्या 66 व्या वर्षा निधन झाले आहे. गेली अनेक वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. नुकतीच त्यांची मेड इन हेवन ही वेबसिरिज प्रदर्शित झाली होती. त्यांच्या अभिनयाचे अनेक जणं फॅन्स होते. जाहिरात, मालिका, चित्रपट, वेबसिरिज अशा अनेक माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. परंतु त्यांच्या निधनानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. गुरूवारी साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत माळवली.

उद्या, शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शाहरूख खानच्या चक दे इंडियातही ते झळकले होते. त्यांनी कॉमेंट्री करणाऱ्याची भुमिका केली होती. त्यांचा चेहरा त्यामुळे कायमच ओळखीचा राहिला आहे. त्यांची 'मेड इन हेवन 2' ही वेबसिरिजही प्रचंड गाजली होती. त्यांनी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या वडिलांचे काम केले होते. 

'सपने सुहाने लडकपन के', 'कुटूंब', 'जुडवा राजा', 'क्योंकी सास भी कभी बहू थी' अशा लोकप्रिय मालिकांतूनही कामं केली होती. सोबतच केएसीच्या जाहिरातीतही ते दिसले होते. त्यांनी चक दे इंडिया, दिल चाहता हैं, हॅप्पी न्यू इयर अशा अनेक चित्रपटांतून कामं केली आहेत. त्याचसोबत त्यांनी आपली स्वत:ची ओळखही निर्माण केली होती. त्यांनी लोकप्रिय मालिकांतूनही नावं कमावली होती. त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमेदेखील केले होते. अगदी छोट्या छोट्या भुमिकेही त्यांनी अजरामर केल्या होत्या. त्यामुळे त्यांची लोकप्रियताही कायम होती. त्यांच्या अभिनयाचीही चांगलीच चर्चा होती. आता त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीत प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही यावेळी त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. 

हेही वाचा : जुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण

रिओ कपाडिया यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिव धाम स्मशान भूमी, गोरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मारिया फराह आणि मुलं अमन आणि वीर आहेत. त्यांनी 'महाभारत'मधूनही गंधारीच्या वडिलांची भुमिका केली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता त्यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. सोबतच त्यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांनी 'बिग बुल', 'खुदा हाफिज' यातूनही भुमिका केली होती.