दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्याने स्टेजवर जाऊन थेट गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, सर्व बघतच राहिले

पुण्यात दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट पार पडला. ज्यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 25, 2024, 12:44 PM IST
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्याने स्टेजवर जाऊन थेट गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, सर्व बघतच राहिले title=

Diljit Dosanjh Pune Concert : प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचे जगभरात कार्यक्रम होत असतात. त्याच्या कॉन्सर्टला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ज्यामध्ये जास्त करून संगीत प्रेमी हजेरी लावत असतात. रविवारी पुण्यातील कोथरुडमधील परिसरात दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टला कोथरुडमधील नागरिकांनी विरोध करत आंदोलन देखील केले होते. कोथरुड मतदारसंघातील भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील दिलजीत दोसांझ कॉन्सर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. 

दरम्यान, अशातच आता दिलजीत दोसांझच्या पुण्यातील कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका चाहत्यांने थेट स्टेजवर जाऊन गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आहे. सध्या याचीच सोशल मीडियावर जास्त चर्चा होत आहे. 

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल 

दिलजीत दोसांझने रविवारी पुण्यातील कोथरुड परिसरात कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्टला दिलजीतच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सध्या याच कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका मुलाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यासोबतच स्टेजवर दिलजीत देखील दिसत आहे. त्या मुलाच्या हातात अंगठी दिसत आहे. तो मुलगा पुढे गुडघ्यावर बसून त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड त्याच्या प्रपोजचा स्वीकार करताना दिसत आहे. त्यानंतर दोघेही एकमेकांनी मिठी मारताना दिसत आहेत. अशातच दिलजीत दोसांझ त्यांच्यासाठी बॅकग्राऊंडला  गाणं गात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दिलजीत दोसांझचं चाहत्यांकडून कौतुक

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमधील व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रपोज केल्यानंतर चाहत्यांनी दोघांना टाळ्या वाजवत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. यावेळी दिलजीत दोसांझने या दोघांना प्रोत्साहन देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दोघांचं त्याने कौतुक देखील केलं आहे. त्याच्या या कॉन्सर्टला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिलजीत दोसांझच्या प्रत्येक कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x