Alia Bhatt Gets Troll : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनं नुकतीच IFFI Goa ला हजेरी लावली होती. यावेळी त्यानं अनेक गोष्टींवर चर्चा केली असताना पत्नी आलियाचा उल्लेख केला. खरंतर आताच्या पिढीला गाणी आणि त्यांसोबत संगीताची जास्त माहिती नाही याविषयी बोलताना त्यानं आलियाचं उदाहरण दिलं. आलियाला दिग्गज गायक किशोर कुमार यांच्याविषयी काही माहित नसल्याचा खुलासा त्यानं केला. पहिल्यांदा जेव्हा तो आलियाला भेटला तेव्हा तिला किशोर कुमार कोण हे माहित नव्हते. रणबीरच्या या खुलाशानंतर आता आलियाला नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत.
रणबीरनं हा किस्सा या कार्यक्रमात एका मुलाखतीत सांगितला. रणबीर हा संपूर्ण किस्सा सांगताना म्हणाला, पहिल्यांदा जेव्हा मी आलियाला भेटलो होतो तेव्हा तिनं मला विचारलं होतं की किशोर कुमार कोण आहे. हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आश्चर्य झालं. तर एक महिला ओरडून म्हणाली काय बोलतोयस, तिला खरंच माहित नाही?
Alia had asked me who is Kishore Kumar - Ranbir Kapoor at IFFI Goa
byu/Glad-Ad5911 inBollyBlindsNGossip
रेडिटवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यावरून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'वर्षभरापूर्वी आलियानं रणबीरचं लिपस्टिकविषयी असलेलं मत सांगितलं होतं, त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं आता रणबीरनं त्याचा सूड घेतला आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्या दोघांनी आयुष्याच्या या टप्प्यावर एकमेकांविषयी बोलणं बंद करायला हवं. आलियाला नक्की काय म्हणायचं. तिला भारताचे राष्ट्रपती कोण आहेत आणि किशोर कुमार कोण आहेत हे माहित नाही. तर काय म्हणायचं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आलिया तिच्या घरी LMFAOOOOOOO (खूप जास्त हसणं) ओरड असेल. आणखी एक नेटकरी म्हणाला, ते दोघं एकमेकांविषयी अशा अनेक गोष्टी सांगत एकमेकांसोबत न कळत खेळताना दिसतात.'
हेही वाचा : Pushpa 2 Item Song : अल्लु अर्जुनसोबत श्रीलीला पाहताच संतापले नेटकरी, समांथाचा उल्लेख करत म्हणाले...
दरम्यान, रणबीर कपूर लवकरच 'रामायण: पार्ट 1' मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्यासोबत 'लव एंड वॉर' मध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता आहे.