DDLJ 25 Years: जेव्हा काजोलचा शॉर्ट स्कर्ट पाहून घाबरला आदित्य चोप्रा

 'मेरे ख्वाबों मे जो आये' या गाण्यातला काजोलचा स्कर्ट इतका छोटा झाला की मनिष आणि आदित्य चोप्रा दोघेही घाबरले

Updated: Apr 29, 2021, 08:59 PM IST
DDLJ 25 Years: जेव्हा काजोलचा शॉर्ट स्कर्ट पाहून  घाबरला आदित्य चोप्रा title=

मुंबई : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या ब्लॉकबस्टर चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात सिमरन म्हणजेच काजोलचं ड्रेसिंग लोकप्रिय डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी केलं होतं. मनीषने सांगितलं की, जेव्हा काजोलचा स्कर्ट लहान झाला तेव्हा तो कसा घाबरला होता.

एका दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, 'मेरे ख्वाबों मे जो आये' या गाण्यात काजोलने व्हाइट कलरचा स्कर्ट घातला होता. आदित्यला हा स्कर्ट थोडा छोटा हवा होता, म्हणून त्याने हा स्कर्ट कात्रीने कापण्यास सुरवात केली.

मनीष पुढे म्हणाला की, स्कर्ट शेवटी इतका छोटा झाला की मी आणि आदित्य चोप्रा दोघेही घाबरलो. मात्र, मला आठवतं की, आदित्यला खात्री होती की, काजोल हे हाताळेलच. आदित्यने काजोलला सांगितलं की, हे गाणं तिच्या आईबरोबर तुला शूट करायचं आहे, अशा परिस्थितीत तुला सेक्सी नाही तर क्यूट दिसायचं आहे.

डीडीएलजेच्या 'मेहंदी लगा के रखाना' गाण्यातील काजोलचा हिरवा लेहंगा ट्रेंड बनला. एका मुलाखतीमध्ये बोलताना मनीष मल्होत्रा म्हणाला की, आदित्य ने अगदी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांना काजोलला त्याला प्रत्यक्षात मांडायचं होतं'

मला वाटतं की, या गोष्टीमुळे डीडीएलजेचा पोशाखात हिट झाला आणि त्यांचे पोषाख एका नवीन आणि विशेष अवतारात दिसले. मनीष म्हणतो की, चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्क्रिप्ट. आदित्यने जेव्हा डीडीएलजेची स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा आम्ही त्या स्क्रिप्टचे वेडे झालो.

लंडनमध्ये सेलिब्रेशन साजरा केलं
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेच्या 25 वर्षांच्या विशेष सोहळ्यानिमित्त लंडनच्या लीसेस्टर चौकात शाहरुख खान आणि काजोल यांच्या कांस्य पुतळ्यांची स्थापना होणार आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा युनायटेड किंगडममध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट आहे

हार्ट ऑफ लंडन बिझिनेस अलायन्सने सांगितलं की, लेसेस्टर  स्क्वायरवरील निवडक चित्रपटांचे देखावे दाखवण्यात येतात. आता यात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सीनची देखील दाखवला जाणार आहे