हिरोईन बनण्यासाठी 'या' अभिनेत्रीसमोर प्रोड्युसरची शरीरसंबंधांची अट

१८ व्या वर्षात कामाच्या बदल्यात हे करणं श्रुतीला पटत न्हवतं

Updated: Apr 29, 2021, 07:40 PM IST
हिरोईन बनण्यासाठी 'या' अभिनेत्रीसमोर प्रोड्युसरची शरीरसंबंधांची अट title=

मुंबई : दररोज अनेक मुली मुंबईत आपलं करिअर बनवण्यासाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. आज आम्ही तुम्हाला अश्या एका मुलीची कहाणी सांगणार आहोत. जी इंडस्ट्रीमध्ये एक्ट्रेस तर बनली. मात्र, तिने तच्या करिअरच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं आहे. तिला एका वाईट घटनेला सामोर देखील जावं लागलं आहे. ज्यामुळे ती खूप रडली देखील आहे. २ फेब्रुवारी १९८९मध्ये केरळच्या एक परिवारामध्ये श्रुति हरिहरनचा जन्म झाला.

श्रुतीने बेंगलोर मध्ये तिचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर. तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं ठरवलं. आणि हा विचार घेवुन तिने मुंबईत पाऊल टाकलं. प्रसिद्ध कोरिओग्राफर इमरान सरदारिया यांची असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून ती जोडली गेली.

ती पार्ट टाईम बॅकग्राऊंड डान्संर म्हणून काम देखील करु लागली. तिने हिरोईन बनण्यासाठी सगळं काही पणाला लावलं होतं. बरिच वर्ष स्ट्रगल केल्यानंतर तिला एका सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती.  ती या सिनमाच्या मिटींगला पोहोचली. आणि प्रोड्युसरने तिला ओके पण सांगितलं.

प्रोड्युसर म्हणाला की, काम मिळेल पण त्यासाठी तुला माझ्यासोबत झोपावं लागेलं.  १८ व्या वर्षात कामाच्या बदल्यात हे करणं श्रुतीला पटत न्हवतं. ती पूर्पणे घाबरुन गेली होती. तिची सगळी स्वप्न एका क्षणात तुटली.

यानंतर ती तिथून काहीच न बोलता  निघून गेली.  आणि रडत रडत तिने हा सगळा किस्सा तिच्या कोरिओग्राफरला सांगितला. तिच्या कोरिओग्राफरने तिला समजवण्याऐवजी तिला ओरडले आणि सांगितलं की, तुला जर हे सगळं सहन करता येत नसेल तर इंडस्ट्रीमध्ये मोठं होण्याचं स्वप्न तू बघू नकोस तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस.

हा सिनेमा तर श्रुतिच्या हातून निघून गेला होता. मात्र, आता श्रुतीने ठरवलं होतं की, यापुढे मी कुणासमोरही हार मानणार नाही. याच्या काहीवेळा नंतर श्रुतीला सिनेमा कंपनी नावाचा एक सिनेमा मिळाला जो बॉक्सऑफिसवर हिट ठरला यानंतर श्रुतीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.