Joseph Manu James Death: 31 वर्षीय Film Director चं आकस्मिक निधन! काही दिवसांत रिलीज होणार होता त्याचा पहिला चित्रपट

Director Death before Debut Film Release: नुकताच या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्या चित्रपटाचं काम संपवलं होतं. हा दिग्दर्शक अवघ्या 31 वर्षांचा होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

Updated: Feb 27, 2023, 01:49 PM IST
Joseph Manu James Death: 31 वर्षीय Film Director चं आकस्मिक निधन! काही दिवसांत रिलीज होणार होता त्याचा पहिला चित्रपट title=
joseph manu james

Director Passes Away before Debut Film Release: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला एक मोठा बसला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील (South Indian Cinema) एका नावाजलेल्या अभिनेता (Actor) आणि दिग्दर्शकाचा (Director) आकस्मिक मृत्यू (Sudden Death) झाला आहे. आपण एखादा चित्रपट तयार केल्यानंतर संपूर्ण जगाने तो पहावा आणि त्याचं कौतुक करावं असं प्रत्येक डायरेक्टरचं स्वप्न असतं. मात्र या 31 वर्षीय दिग्दर्शकाचं हे स्वप्न अधुरं राहिलं आहे. मरण पावलेला हा डायरेक्टर अवघ्या 31 वर्षांचा (31 year old) होता. या डायरेक्टरचा पहिला चित्रपटही (First Film) प्रकाशित झालेला नाही. काही दिवसांमध्येच या दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र त्यापूर्वीच या डायरेक्टरचं निधन झाल्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. हा डायरेक्टर कोण आणि त्याच्या कोणता चित्रपट प्रदर्शित होणार होता जाणून घेऊयात...

कोण होता हा दिग्दर्शक?

निधन झालेला 31 वर्षीय जोसेफ मनु जोम्स (Joseph Manu James) हा मल्याळम (Malyalam) चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं व्यक्तीमत्व होतं. जोसेफ हेपटायटीसवर (Hepatitis) उपचार घेत होता. उपचारांदरम्यानच त्याचं निधन झालं. केरळमधील (Keral) एर्नाकुलम शहरामधील (Ernakulam) अलुवा हॉस्पीटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. जोसेफचा (Joseph) मृत्यू 24 तारखेला झाल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aju Varghese (@ajuvarghese)

नुकताच दिग्दर्शित केलेला एक चित्रपट

वर नमुद केल्याप्रमाणे जोसेफ मनु जेम्सने (Joseph Manu James) नुकतेच त्याच्या पहिल्या चित्रपटाचं काम पूर्ण केलं होतं. जोसेफने 'नैन्सी राणी' (Nancy Rani) नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार होता. या चित्रपटामध्ये आहाना कृष्णा (Ahana Krishna) आणि अर्जुन अशोकन (Arjun Ashokan) हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. जोसेफचं असं अचानक निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी अभि चाहत्यांनी जोसेफला श्रद्धांजली अर्पण केली आहे. जोसेफच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का आहे.