Director Death At The Age Of 52 : लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक गुरु प्रसाद ते त्यांच्या घरात मृत अवस्थेत सापडले आहेत. गुरु प्रसाद हे 52 वर्षांचे होते. तर बंगळुरु नॉर्थच्या मदनायकनहल्ली स्थित असलेल्या अपार्टमेंटमध्ये होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी जेव्हा त्यांना घरातून दूर्गंधी येत असल्याची बातमी पोलिसांना दिली, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. दरम्यान, असं म्हटलं जातं की त्यांच्या निधनाला 10 दिवस झाले आहेत. त्यांनी कथितपणे गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या निधनाचं खरं कारण काय हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्यांच्यावर खूप जास्त कर्ज होतं आणि त्यासाठी कर्जदार सतत त्यांना कॉल करत होते.
गुरु प्रसाद हे गेल्या 8 महिन्यांपासून या अपार्टमेंटमध्ये राहत होते. तर त्याचं नुकतंच लग्न झालं होतं. गुरु प्रसाद यांच्या विषयी बोलायचं झालं तर त्यांनी 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माता' ते एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ‘एडेलु मंजूनाथ’, ‘एराडेन साला’ आणि ‘रंगनायका’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. गुरु प्रसाद यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.
‘रंगनायका’ हा गुरु प्रसाद यांचा अखेरचा चित्रपट होता. हा देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती आणि त्यासोबत अभिनय देखील केला होता. चित्रपटाला अपेक्षीत यश न मिळाल्यानं ते दुखी होते. तर कर्जदार त्यांच्याकडे सतत पैसे मागत होते. तर गुरु प्रसाद हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘एडेमा’ साठी काम करत होते. सध्या त्यांच्यावर एका पुस्तकांच्या दुकानाच्या मालकानं पैसे परत न दिल्याचा आरोप केला आणि तक्रार दाखल केली.
हेही वाचा : शबाना आजमी यांच्याशी लग्न करायला तयार नव्हते जावेद अख्तर; मध्य रात्री मित्रानं शोधून आणला मौलवी
बंगळुरुच्या जयनगरमध्ये असलेल्या टोटल कन्नड बूकस्टोरचे मालक लक्ष्मीकांत यांनी गुरु प्रसाद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यांत त्यांनी दावा केला की 2019 मध्ये गुरु प्रसाद यांनी त्यांच्या दुकानातून कन्नड साहित्य आणि चित्रपटा संबंधीत अनेक गोष्टी या खरेदी केल्या. गुरु प्रसादनं कथितपणे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी 100 पुस्तकांवर थोडी सूट द्या असं सांगितलं होतं. प्रत्येकात 75 पुस्तकांचे पाच सेट होते. ज्याची एकूण किंमत ही 65 हजार रुपये होती. तक्रारित असं म्हटलं होतं की त्यांनी पैश्यांची परतफेड केली नाही आणि या सगळ्यातून वाचण्यासाठी त्यानं घर बदललं.