ओंकार भोजनेनं हास्यजत्रा सोडण्यावर दिग्दर्शक म्हणाले, 'कोणाच्या असण्यानं किंवा जाण्यानं...'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. 

Updated: Nov 2, 2022, 07:34 PM IST
ओंकार भोजनेनं हास्यजत्रा सोडण्यावर दिग्दर्शक म्हणाले, 'कोणाच्या असण्यानं किंवा जाण्यानं...' title=

Comedy Show Maharashtrachi Hasyajatra​: छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो प्रचंड लोकप्रिय आहे. शोमधील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, या शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ओंकार भोजने (Omkar Bhojne) दिसला नाही. त्यानंतर तो अचानक 'फू बाई फू'च्या प्रोमोमध्ये दिसला. ते पाहिल्यानंतर त्यानं महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून काढता पाय घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई टाइम्सनं ओंकारशी संपर्क साधला. यावेळी ओंकार म्हणाला की, 'सध्या मी गडबडीत आहे. एका कामात व्यस्त आहे. मी नंतर बोलतो, कळवतो.' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाबरोबर ओंकार पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत करारबद्ध आहे. काही महिन्यांपूर्वी त्यानं हास्यजत्रेच्या निर्मिती संस्थेला एक मेल केला होता. त्यामध्ये त्यानं 'काही काळ सिनेमांच्या चित्रीकरणासाठी मी हास्यजत्रेच्या चित्रीकरणाला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे आता ब्रेक घेत आहे', असं सांगितल्याचे म्हटलं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, ओंकारआधी या अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी शोला रामराम केला होता. विशाखा सध्या नाटकांच्या निर्मितीत व्यस्त आहे. विशाखाच्या नाटकात पंढरीनाथदेखील अभिनय करत आहे. तर, ओंकार हा 'फू बाई फू'मध्ये दिसणार आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. (Director of Maharashtrachi Hasyajatra on Omkar Bhojne Pandharinath Kambli and vishakha subhedar leaving the show) 

कलाकारा शो सोडत आहेत यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे दिग्दर्शक म्हणाले, 'कलाकार एकत्र येऊन एक चांगली कलाकृती घडवतात. त्यामुळे ते स्वतः मोठे होतात आणि ती कलाकृतीदेखील मोठी होते. त्यामुळे कलाकाराचं त्या कलाकृतीबरोबरचं नातं महत्त्वाचं असतं. हे नातं कसं जपायचं हे ज्यानं-त्यानं ठरवायचं असतं. कोणाच्या असण्यानं किंवा जाण्यानं त्या कलाकृतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फरक पडत नाही. कलाकृतीची बांधिलकी प्रेक्षकांबरोबर असते. प्रेक्षकांना ती कलाकृती आवडल्यास तिला ते डोक्यावर घेतात आणि पसंत पडली नाही तर ते मनोरंजनासाठी दुसऱ्या कलाकृतीकडे जातात.'