मुंबई : सध्या अभिनेता सनी देओल 'गदर 2' च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. त्याच्या चित्रपटाने जगभरात 600 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. मात्र याच दरम्यान त्याच्या जुहूच्या बंगल्याच्या लिलावामुळे त्यांची चांगलीच चर्चाही झाली. आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते सुनील दर्शन यांनी सनी देओलवर सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिग्दर्शकाने सांगितलं की, हे प्रकरण 27 वर्षे जुनं आहे आणि त्यामुळेच ते याबाबत कायदेशीर लढाई लढत आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनील दर्शनने सांगितलं की, 'हे प्रकरण १९९६ चं आहे. सनी देओलला फिल्म डिस्ट्रीब्यूशन कंपनी उघडायची खूप ईच्छा होती. त्यामुळे मी त्याला यात मदत केली. वेळ निघून गेली, पण त्याने पैसे परत केले नाहीत. या दरम्यान त्याने स्वतःच्या अनेक प्रॉपर्टीमध्ये इनवेस्ट केलं.
सुनीलने पुढे सांगितलं की, त्या दिवसांत 'अजय' या त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होणार होतं. त्याच्या वाढदिवशी सनी देओलने मला विनंती केली होती की त्याला फिल्म डिस्ट्रीब्यूशन कंपनी उघडायची आहे. त्यांनी मला 'अजय'साठी परदेशात डिस्ट्रीब्यूशन राइट्स मागितले. त्याने मला सांगितलं की, तो मला माझे सगळे पूर्ण पैसे देईल. त्यानंतर तो लंडनला गेला.
चित्रपट दिग्दर्शकाने पुढे सांगितलं की, सनी देओलचा माणूस त्याच्याकडून चित्रपटाच्या प्रिंट्स घेण्यासाठी आला होता, मात्र यावेळी त्याने पैसे आणले नाहीत. यानंतर जेव्हा त्याने सनी देओलला फोन केला तेव्हा तेव्हा अभिनेता म्हणाला की, ख्रिसमसच्या सुट्टीमुळे लंडनमध्ये बँका बंद आहेत. यावंर दिग्दर्शक म्हणाला, 'यानंतर मी अनेकदा सनीकडे पैसे मागितले, पण तो सतत मला टाळत राहिला. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
आपलं बोलणं संपवत सुनील दर्शन म्हणाले की, जवळपास 27 वर्षे झाली तरी त्यांनी माझे पैसे परत केलेले नाहीत. मी कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे. हे प्रकरण चर्चेतून सोडवण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण सनी देओलला न्यायालयाचा निर्णयही मान्य नाही. मला वाटतं ते पैसे परत करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. चित्रपट निर्मात्याने सांगितलं की, आजही अभिनेत्याकडे 1 कोटी 77 लाख 25 हजार रुपये थकीत आहेत.