अभिनेत्रीने शिक्षणावर सोडलं पाणी; फक्त 500 रूपये घेवून आली मुंबईत, त्यानंतर...

...त्यानंतर दिशाच्या करियरला मिळाली नवी दिशा 

Updated: Jun 13, 2021, 11:49 AM IST
अभिनेत्रीने शिक्षणावर सोडलं पाणी; फक्त 500 रूपये घेवून आली मुंबईत, त्यानंतर...

मुंबई : असे अनेक कलाकार आहेत, जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाच्या विरोधात जात मुंबईत येतात. स्वप्नांची शिदोरी बांधून आलेल्या  या कलाकारांपैकी काहींच्या स्वप्नांना पंख मिळतात, तर काहींचे स्वप्न मात्र पूर्ण होत नाहीत. पण काहींच्या नशिबात अफाट यश असतं. अशीचं एक अभिनेत्री बॉलिवूडला लाभली आहे. ती म्हणजे अभिनेत्री दिशा पाटनी. आज दिशाचा वाढदिवस आहे. दिशाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवू तिच्याबद्दल काही खास गोष्टी. 

दिशाचं करियर
दिशाने 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटात तिची भूमिका अत्यंत लहान होती. पण तिचं भूमिका तिच्यासाठी अत्यंत लकी ठरली. चित्रपटात तिने धोनीच्या गर्लफ्रेन्डची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी दिशाने तेलगू चित्रपट 'लोफर' मध्ये भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने अनेक म्यूझीक व्हिडिओंमध्ये काम केलं. आता सध्या ती  'कुंग फू पाडा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

अभिनयासाठी सोडलं शिक्षण 
खुद्द दिशाने मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.  दिशा जेव्हा मुंबईत आली होती तेव्हा तिच्याकडे फक्त 500 रूपये होते. दिशा म्हणाली, 'जेव्हा मी मुंबईत आली तेव्हा मी एकटीचं राहात होती. काम करायची पण मी घरच्यांकडून पैसे मागितले नाहीत.' यावेळी दिशाने तिच्या लहानपणीचा किस्सा देखील सांगितला. 

'लहान असताना नवीन फोन बाजारात यायचे. तेव्हा मी आणि माझी बहिण कोणत्याही नंबरवर फोन करत समोरच्या व्यक्तीसोबत बोलायचो.' लहानपणी दिशा अशी खोडकर होती. महत्त्वाचं म्हणजे फक्त 500 रूपये घेवून मुंबईत येणारी दिशा आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. आता वांद्रे परिसरात तिचं स्वतःचं घर आहे. तिच्या घराचं नाव 'लिटिल हट' असं असून तिच्या घराची किंमत 5 कोटी रूपये आहे.