दिशा पटानीनं आपल्या नव्या लुकनं इंटरनेटचं वाढवलंय तापमान... फोटो झाले Viral

टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतरही दिशा पटानी आपल्या करिअरवर भर देताना दिसते आहे. दिशाने स्वतःला आता कामात झोकून दिले आहे. आजकाल ती कुठल्या पार्ट्यांमध्येही दिसत नाही. ती यंदा दिवाळी पार्टीमध्ये फारशी दिसली नाही. 

Updated: Oct 22, 2022, 08:39 PM IST
दिशा पटानीनं आपल्या नव्या लुकनं इंटरनेटचं वाढवलंय तापमान... फोटो झाले Viral title=

Disha Patani New Look: बॉलीवूड सेलिब्रेटी कायमच आपल्या इन्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असतात. बॉलीवूड सेलिब्रेटींचं आयुष्य लाईट्स, कॅमेरा आणि एक्शनच्या पलीकडे फार काही नसल्यामुळे सतत ग्लॅमरस राहणं हे अपरिहार्यचं असतं. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा लुक सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. (disha patani new look actress shares a new look on instagram after breakup with tiger shroff)

टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतरही दिशा पटानी आपल्या करिअरवर भर देताना दिसते आहे. दिशाने स्वतःला आता कामात झोकून दिले आहे. आजकाल ती कुठल्या पार्ट्यांमध्येही दिसत नाही. ती यंदा दिवाळी पार्टीमध्ये फारशी दिसली नाही. 

आता दिशाने दिवाळीच्या मुहूर्तावर तिचा हॉट फोटो शेअर केला आहे आणि तो पाहून लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. दिशाच्या या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार लोकांना वेड लावत असून आतापर्यंत 14 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. फोटोवर हजारो कमेंट्स आल्या असून चाहत्यांनी दिशावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या फोटोत दिशा ब्रँडेड ब्रामध्ये दिसते आहे आणि तिचा हा लूक सर्वांनाच भुरळ घालत आहे. दिशाने या लूकमध्ये पुन्हा एकदा लोकांना आश्चर्यचकित केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोन-तीन दिवसांपूर्वी दिशाने बॉक्सिंगचा सराव करतानाचा एक व्हिडिओ टाकला होता, ज्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. पडद्यावर आणि पडद्यामागेही ती ही प्रतिमा जपते. ती वेळोवेळी सुंदर ड्रेस आणि बिकिनीमध्ये तिचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत असते. तिचे फोटो अनेकदा इंटरनेट जगतात खळबळ माजवतात.

दिशा आता सूर्या 42 या चित्रपटातच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दिशा तामिळ स्टार सुरियासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.