महडला जायला निघाले मात्र पोहोचले भलतीकडेच, गुगल मॅपची मदत घेतली पण स्पेलिंगमुळं झाला घोळ

Maharashtra News: रायगड जिल्ह्यातील महडकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना सहन करावा लागत आहे. महाड आणि महड या दोन्ही ठिकाणांच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये साधर्म्यामुळं हा गोंधळ होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 9, 2025, 07:59 AM IST
महडला जायला निघाले मात्र पोहोचले भलतीकडेच, गुगल मॅपची मदत घेतली पण स्पेलिंगमुळं झाला घोळ title=
maharashtra news Went to Mahad reached Mahad After google map Directs

Maharashtra News: जाना था जपान पोहोच गये चीन, हे तुम्ही नेहमी ऐकलं असेलच. मात्र महाराष्ट्रातील काही भाविकानांही असाच एक अनुभव आला आहे. गुगल मॅपच्या आधारे प्रवास करत असताना स्पेलिंग चुकीचं टाकल्याने या प्रवाशांचा चांगलाच गोंधळ झाला. महडला निघालेले भाविक महाडला पोहोचले. दोन्ही शहरातील स्पेलिंग साधर्म्यामुळं त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 

महड आणि महाड या दोन्ही ठिकाणी इंग्रजी स्पेलिंगमध्ये साधर्म्य असल्याने महड येथे निघालेले अनेक भाविक महडपासून सुमारे 100 किमी दूर असलेल्या महाडमध्ये पोहचतात. गुगल मॅपचा आधार घेऊन हे भाविक प्रवास करतात. अष्टविनायकांपैकी महड येथे एक गणेश मंदिर असून तिथं दर्शनासाठी अनेक जण जातात. अशावेळी नागरिक गुगल मॅपचा आधार घेऊन प्रवास करतात.

महड आणि महाड दोन्हींमध्ये स्पेलिंग साधर्म्य असल्याने ते ते महाड शहरात पोहोचतात. अशावेळी ते वरद विनायक गणेश मंदिर कुठे आहे, असा प्रश्न स्थानिकांना विचारतात. तेव्हा स्थानिकांना लक्षात येतं की ते रस्ता चुकले आहेत. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपण रस्ता चुकलो आहेत. अशावेळी स्थानिक त्यांना मार्गदर्शन करतात. 

महाड शहरातदेखील अनेक छोटी छोटी गणेश मंदिरे आहेत. त्यामुळं रस्ता चुकलेल्या अनेक प्रवासी महाड तालुक्यातील रायगड किल्ला, गांधार पाले लेणीपाहून पुढचा प्रवास करतात. तर काही जण या स्पेलिंगच्य साधर्म्यामुळं अधिक प्रवासामुळं मनस्ताप सहन करावा लागतो. 

गुगल मॅपमुळं रस्ता चुकला

एखाद्या नवीन ठिकाणी जात असताना आजकाल सर्रास गुगल मॅपची मदत घेतली जाते. पण या गुगल मॅपमुळं अनेकदा रस्ता चुकायला देखील होतं. त्यामुळं अनेकदा चालक आणि प्रवासी अडचणीत येतात. उत्तर प्रदेशच्या बरेली येथेही अशीच एक घटना घडली होती. तीन प्रवासी चुकीच्या रस्त्याने गेले आणि जीवाला मुकले होते. विवाह सोहळ्यातून घरी परतण्यासाठी त्यांनी रस्ता कळावा यासाठी जीपीएस नेव्हिगेशन सुरू केले. गुगल मॅपच्या मदतीने ते प्रवास करत होते. मात्र, गुगल मॅपने त्यांना चुकीचा रस्ता दाखवला. मॅपवरील एका रस्त्यावर पुलाचे बांधकाम अर्धवट होते. मात्र गुगल मॅपवर याची माहितीच नव्हती.