छोट्या पर्सची मोठी चर्चा.. दिशा पटानीच्या 'या' पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण

दिशा पटानीने काहीही केलं की, ती लगेच चर्चेत येते.

Updated: Apr 30, 2022, 07:55 PM IST
छोट्या पर्सची मोठी चर्चा.. दिशा पटानीच्या 'या' पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण title=

मुंबई : दिशा पटानीने काहीही केलं की, ती लगेच चर्चेत येते. मग ते तिच्या ड्रेसिंग स्टाईलबद्दल असो किंवा तिच्या फिटनेस व्हिडिओबद्दल.  जेव्हा ही ग्लॅमरस अभिनेत्री घराबाहेर पडते, तेव्हा तिची चर्चा व्हायलाच हवी. यावेळी दिशा पटानी दोन कारणांमुळे चर्चेत आली आहे. पहिलं कारण म्हणजे तिचा स्टायलिश लूक आणि दुसरं कारण म्हणजे तिची माचिसच्या पेटीएवढी पर्स.

दिशाची छोटी पर्स चर्चेत
खरंतर, गुरुवारी रात्री टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हिरोपंती 2 चित्रपटाचं स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये टायगरची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी तिथे पोहोचली होती. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. दिशा पटानी या स्पेशल इव्हेंटमध्ये पर्पल कलरचा मिनी ड्रेस परिधान करून पोहोचली होती. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत होती.

तिने तिचा लूक कर्ल्स हेअरस्टाईल, मॅचिंग कानातले आणि हाई हिल्सने पूर्ण केला. तिच्या छोट्या गोंडस पर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

छोटी पण खूप महागडी पर्स
ही अतिशय छोटी पर्स सध्या खूप चर्चेत आहे. ही पर्स छोटी असली तरी त्याची किंमत तुम्हाला कळली तर तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. खरंतर, या छोट्या पर्सची किंमत इतकी आहे की, तुम्ही त्यात 2 टन एसी सहज खरेदी करू शकता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पर्सची किंमत सुमारे 46 हजार रुपये आहे. त्याचबरोबर, जेव्हापासून या छोट्या पर्सची किंमत व्हायरल झाली आहे. तेव्हापासून प्रत्येकजण त्याची खासियत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याचबरोबर, केवळ पर्सच नाही तर या स्क्रिनिंगमध्ये दिशाने परिधान केलेला ड्रेस देखील कमी मौल्यवान नाही. या ड्रेसची किंमतही जवळपास एक लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.