मुंबईत रंगला दिशा वकानीचा 'गोदभराई'चा सोहळा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेतून घरा घरात पोहचलेली दया बेन म्हणजचेच दिशा वकानी लवकरच आई होणार आहे.

Updated: Oct 2, 2017, 08:48 PM IST
मुंबईत रंगला दिशा वकानीचा 'गोदभराई'चा सोहळा

 मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेतून घरा घरात पोहचलेली दया बेन म्हणजचेच दिशा वकानी लवकरच आई होणार आहे.

नुकताच तिच्या 'गोदभराई'चा कार्यक्रम पार पडला. दिशाच्या घरीच हा गोदभराईचा कार्यक्रम पार पडला. 
 १७ सप्टेंबरला दिशाने 'तारक मेहता..'चा शेवटचा भाग शूट केला होता. त्यानंतर दया काही महिने या मालिकेपासून दूर राहणार आहे. 

 दिशाने गोभराईच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तसेच फुलांपासून बनवलेल्या नाजूक दागिन्यांमध्ये दिशा अजूनच मोहक दिसत होती. दिशाच्या गोदभराईला तारक मेहता...  ची टीमही पोहचली होती. मालिकेत दयाबेनच्या मुलाची भूमिका साकारणारा टप्पू म्हणजेच भव्य गांधीही आवर्जुन हजर होता. भव्यने त्याचा फोटो सोशलमीडीयावरही शेअर केला आहे.

 

Glad to be a part of my “reel” mother’s “real” baby shower ceremony.

A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97) on

 

 दिशा वकानी गेल्या वर्षी मयुर पांड्याशी विवाहबद्ध झाली होती. तारक मेहता.... प्रमाणेच दिशा 'खिचडी', 'देवदास' ,'जोधा अकबर' अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.