'दया बेन' फेम दिशाच्या एक्झिटबद्दल निर्मात्याने केला खुलासा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधून घराघरात पोहचेल्या 'दया बेन'ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र 'दया बेन' ही भूमिका साकारणारी दिशा वाकनी सध्या आईपण एन्जॉय करत असल्यामुळे मालिकेपासून दूर झाली आहे.  

Updated: Mar 12, 2018, 02:34 PM IST
'दया बेन' फेम दिशाच्या एक्झिटबद्दल निर्मात्याने केला खुलासा

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधून घराघरात पोहचेल्या 'दया बेन'ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र 'दया बेन' ही भूमिका साकारणारी दिशा वाकनी सध्या आईपण एन्जॉय करत असल्यामुळे मालिकेपासून दूर झाली आहे.  

सप्टेंबर महिन्यापासून दूर  

दिशा वाकनीने गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर महिन्यापासून दिशा गरोदरपणाच्या रजेवर आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मार्च महिन्यापासून दिशा पुन्हा मालिकेचे शूटिंग सुरू करणार होती. मात्र अजूनही दिशाने कामाला सुरूवात केली नसल्याने ती मालिकेपासून कायमची दूर झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे.  

खरंच दिशा वाकनी मालिका सोडणार ? 

काही महिन्यांपूर्वी दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अवघ्या काही महिन्यांच्या मुलीला सांभाळून मालिकेचं शूटिंग करणं हे अवघड काम आहे. त्यामुळे दिशाच्या पुनरागमानाबाबत चर्चा रंगली आहे.  

प्रोड्युसरने दिली माहिती 

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, दिशा वाकनी किंवा मालिकेकडून कोणीही अजूनही दिशाच्या एक्झिट बाबत पसरत असलेल्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 'अजून दिशाच्या एक्झिटबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही' अशी माहिती 'तारक मेहता ... चे निर्माते असित मोदी यांनी दिली आहे.