'Taarak Mehta...'फेम Disha Vakani ने स्कर्ट आणि बिकनी टॉपमध्ये धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

पाहा दिशा वकाणीचा हॉट डान्स व्हिडिओ 

Updated: Aug 19, 2021, 02:59 PM IST
'Taarak Mehta...'फेम Disha Vakani ने स्कर्ट आणि बिकनी टॉपमध्ये धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका प्रचंड आवडते. टप्पूसेनेची मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील रहिवाशांची ऐकी... मालिकेची ओळख आहे. मालिकेतील दयाबेनच्या प्रतीक्षेत आजही चाहते आहेत. आजही मालिकेत तिची कमतरता भासते. सध्या दिशा मालिकेत दिसत नसली तरी चर्चेत असते. अशात दिशाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिशा स्कर्ट आणि बिकनीमध्ये दिसत आहे. 

मालिकेत फक्त गरब्यावर थिरकणाऱ्या दयाबेनला बोल्ड डान्स देखील येतो. दिशा वकाणीचा हा अंदाज कोणाला माहिती नसेल. दिशाच्या या व्हिडिओवर अनेकांच्या कमेन्ट येत आहेत. एका फॅनने कमेन्टमध्ये लिहिलं की 'टप्पूची आई बिघडली..' तर दुसऱ्या युझरने लिहिलं 'जेठालालला सांगू का?' पण दिशाच्या काही चाहत्यांना तिचा डान्स पसंतीस पडला आहे.

याआधी देखील दिशाचा एक डान्स नंबर व्हायरल झाला होता. गाण्याचं नाव होतं  'दरिया किनारे एक बंगलो...' हे गाणं देखील तुफान गाजलं होतं. त्यानंतर दिशा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पण आता ती मालिकेत काही कारणांमुळे दिसत नाही.