ईशा देओलला या व्यक्तीमुळे करता आलं नाही चित्रपटांमध्ये काम

'धुम मचाले' गाण्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री ईशा देओल गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे.

Updated: Aug 19, 2021, 01:01 PM IST
ईशा देओलला या व्यक्तीमुळे करता आलं नाही चित्रपटांमध्ये काम  title=

मुंबई : 'धुम मचाले' गाण्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री ईशा देओल गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. 2002 साली ईशाने करियरची सुरूवात केली. ईशाने फार कमी काळात प्रेक्षकांना एकापेक्षा एक चित्रपट बॉलिवूडला दिले. पण 2011 सली तिने अभिनयाला बाय-बाय केलं. त्यानंतर ती कधीही चित्रपटांमध्ये दिसली नाही. नुकताचं निशाने तिच्या या निर्णयाबद्दल उघडपणे सांगितलं आहे. ईशा म्हणाली, मला माझ्या आयुष्यात सेटल व्हायचं होतं म्हणून चित्रपटांपासून दूर होती. 

नुकताचं दिलेल्या एका मुलाखतीत ईशा म्हणाली, 'मला त्यावेळी भरतसोबत नव्या आयुष्याची सुरूवात करायची होती. मला स्वतःचं कुटुंब हवं होतं. म्हणून मी लग्न केलं. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांना सर्वात जास्त गरज आईची असते. प्रत्येकाला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला हवा.' ईशाच्या मते आयुष्यात कुटुंबाचं महत्त्व फार मोठं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण आता ईशा पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. ईशा अभिनेता अजय देवगनसोबत 'रूद्र'मध्ये दिसणार आहे. 'रूद्र' हा 'लूथर' चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. सांगायचं झालं तर, ईशा 'काल' (2005), 'युवा' (2004) आणि 'मैं ऐसा ही हूं' (2005) या चित्रपटांमध्ये अजयसोबत दिसली होती. आता पुन्हाती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर आता ईशाला प्रेक्षक स्विकारतील की नाही हे येणारा काळचं ठरवेल.