श्रुती हसनचा बिघडलेला चेहरा बघून चाहते घाबरले; फोटो व्हायरल

नुकताच श्रुति हसनने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. 

Updated: Nov 29, 2022, 09:26 PM IST
श्रुती हसनचा बिघडलेला चेहरा बघून चाहते घाबरले; फोटो व्हायरल title=

मुंबई : सिनेसृष्टीतले कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मात्र याशिवाय आपल्या ग्लॅमरस आणि डॅशिंग लूकमुळे ते कायम चर्चेत असतात. कायम स्टार्स सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात. जे प्रत्येक एंगलने परफेक्ट असतात. मात्र नुकताच श्रुति हसनने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे. 

श्रुतीने शेअर केले असे फोटो
श्रुतीने तिच्या इंस्टाग्रामवर असे काही फोटो शेअर केले आहेत, जे सहसा स्टार्स शेअर करत नाहीत. पहिल्या फोटोत श्रुतीने केस मोकळे सोडल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती पूर्णपणे आजारी आणि थकलेली दिसत आहे.

हे फोटो शेअर करत श्रुतीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "परफेक्ट सेल्फी आणि पोस्टच्या जगात, काही असं जे  फायनल कटपर्यंत पोहोचलं नाही. केसांचा खराब दिवस, ताप आणि सायनसमध्ये सूजेचा दिवस, पीरियड क्रॅम्पचा दिवस आणि बाकीच्या गोष्टी तुम्हालाही आवडतील अशी आशा आहे.''

साधेपणाने चाहत्यांची जिंकली मनं 
स्टार्सच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला असला तरी श्रुतीची ही साधी स्टाईलही लोकांची मनं जिंकत आहे. त्याचे हे फोटो लोकांना खूप आवडतात आणि साधेपणाचं कौतुक करत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, "असली असली होता, कोई मुकाबला नहीं." आणखी एका युजरने लिहिलं की, "खूप निष्पाप चेहरा." तर दुसर्‍या युजर्सने "अजूनही सुंदर" अशी कमेंट केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रुति हासनच्या या फोटोवर युजर्सचे काही अशाप्रकारच्या कमेंट्स पहायला मिळत आहेत. लोक तिच्या या लूकला खूप सुंदर म्हणत आहेत. याचबरोबर तिच्या या फोटोवर हार्ट ईमोजीव्दारे आपली रिएक्शन देत आहेत. जर आपण श्रुति हासनच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर अभिनेत्री प्रभासच्या सालारसोबतच बालकृष्ण यांच्या वीरा सिम्हा रेड्डी आणि चिरंजीवी यांच्या 'वाल्टेयर वीरय्या'सारख्या सिनेमात दिसणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x