घटस्फोटोनंतर अभिनेत्रीने सहा वर्ष ठेवले नाही शारिरीक संबध; सांगितलं यामागचं कारण

अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक रहस्य उघड केलं आहे, 

Updated: Oct 21, 2022, 09:42 PM IST
घटस्फोटोनंतर अभिनेत्रीने सहा वर्ष ठेवले नाही शारिरीक संबध; सांगितलं यामागचं कारण title=

मुंबई : जेव्हापासून अभिनेत्री ड्रयू बॅरीमोरने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक रहस्य उघड केलं आहे, तेव्हापासून तिची सर्वत्र चर्चा होत आहे.ड्रयू बॅरीमोरने खुलासा केला आहे की, ती गेल्या 6 वर्षांपासून कोणाशीही शारिरीक संबधात नाही. 2016 मध्ये पती विल कोपलमनपासून वेगळं झाल्यानंतर तिने कोणतेही संबंध ठेवले नाहीत. एका चाहत्याने अभिनेत्रीबद्दल दावा केला होता की, तिला सेक्सचा तिरस्कार आहे. यानंतर अभिनेत्रीने हा दावा चुकीचा ठरवत आपलं म्हणणं मांडलं आहे.

ड्रयू बॅरीमोरने वैयक्तिक रहस्य उघड केलं
ड्रयू बॅरीमोरने सांगितलं की तिला सेक्सचा तिरस्कार नाही. जिने ज्या व्यक्तीशी लग्न केलं आणि तिला ज्याच्यापासून मुलं आहेत. त्या व्यक्तीसोबत तिला संपूर्ण आयुष्य घालवता न आल्याने ती तुटली आहे. ती दोन मुलींची एकटी आई आहे. ड्रयू बॅरीमोरने तिच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, वयाच्या 48 व्या वर्षी जवळीकाबद्दलची माझी भावना मी मोठी होत असताना जी भावना होती त्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला आदर्श पालक नव्हते. माझं लहानपणापासूनच लोकांशी जुळलं. मी सहवास, आनंद, उत्साह, आनंद, मजा, साहस शोधत होते. जेव्हापासून मी जीवनाच्या त्या टप्प्यात प्रवेश केला, जिथे मी एकटी आई आहे. तेव्हापासून माझं कोणतेही शारिरीक संबध नाही.

सेक्सचा द्वेष करू नका, ड्रयू बॅरीमोर
ड्रयू बॅरीमोरने पुढे लिहिलं की, काही लोकं लग्न किंवा नात्यातून बाहेर पडून भविष्यात दुसऱ्या नात्यात जाऊ शकतात. यात काही गैर नाही. जरा पण नाही. मी याला सपोर्ट करत नाही. मी याचा प्रवास साजरा करते. कारण काही लोकांसाठी ते कार्य करतं. माझ्यासाठी काम करत नाही अभिनेत्रीने तिच्या ब्लॉगमध्ये स्पष्टपणे लिहिलं की तिला सेक्सचा तिरस्कार नाही. फक्त तिला कळलं आहे की प्रेम आणि सेक्स या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही एकसारख्या नाहीत. 

फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, ड्र्यू बॅरीमोरचा इंटीमेट रिलेशनशिपवरील ब्लॉग तेव्हा आला. जेव्हा एका महिलेने, तिलाला ओळखलं नाही. असं म्हटलं की, ही एक अशी अभिनेत्री आहे जिला सेक्सचा तिरस्कार आहे. ड्र्यू बॅरीमोरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने तीन लग्नं केली होती. पण एकही लग्न टिकलं नाही. तीन वेळा घटस्फोट घेतलेली ड्र्यू बॅरीमोर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.