बिग बॉस विजेतीची ही अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का; अभिनेत्रीवर का आली असावी अशी वेळ?

नुकताच बिग बॉस विजेतीचा असा एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून लोकं आश्चर्यचकित होत आहेत.

Updated: Jul 5, 2022, 02:00 PM IST
बिग बॉस विजेतीची ही अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का; अभिनेत्रीवर का आली असावी अशी वेळ? title=

मुंबई : जेव्हा-जेव्हा बिग बॉस येतं. तेव्हा विजेत्याची नेहमी चांदी होते. पैशांशिवाय अनेक प्रोजक्टही त्या विजेत्याकडे जातात. पण नुकताच बिग बॉस विजेतीचा असा एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून लोकं आश्चर्यचकित होत आहेत.

ओळखणं झालं कठीण
'बिग बॉस ओटीटी'च्या विजेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून लोकांना धक्का बसत आहे. लोकांना समजत नाही की ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण आहे? फोटो पाहून ओळखणं खूप अवघड आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, ही अभिनेत्री कोण आहे आणि ती अशा अवतारात का दिसत आहे? त्यामुळे आम्ही तुमचा गोंधळ आता दूर करणार आहोत.

खरंतर, ही दुसरी तिसरी कोणी नसून 'बिग बॉस ओटीटी'ची विजेती दिव्या अग्रवाल आहे. यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण असलं तरी हे खरं आहे. अभिनेत्री दिव्या अग्रवालचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, हा फोटो तिच्या वेब सीरिजचं पात्र आहे. हा लूक एस्थेटिक मेकअपच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अल्ट बालाजीच्या 'कार्टेल' या वेबसिरीजमध्ये दिव्या अग्रवाल वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिव्या सिरियल किलर बनली
'कार्टेल' या वेब सीरिजमध्ये दिव्या अग्रवाल सीरियल किलर बनली होती. या वेब सीरिजमध्ये दिव्या प्रत्येक घटना घडण्यापूर्वी नवीन लूक घेत असे. या फोटोमध्ये ती हॉस्पिटलमध्ये सफाई करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत ती दिसत आहे. चेहर्‍याचं रूप पूर्णपणे बदललं दिसत आहे. मोठमोठे दात, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि अंगावरचा रंग यामुळे तिला ओळखणंही कठीण झालं आहे.  अभिनेत्रीची ही शैली पहिल्यांदाच पाहायला मिळाली.