मुंबई : प्रेमाच्या नात्यात वादळं येतात हे मान्य. पण, ही वादळं किंवा मतभेद कुठवर ताणायचे हे जर ठरवलं नाही, तर मात्र नात्याला नकळत तडा जातो आणि त्यानं होणाऱ्या वेदना असह्य असतात. सध्या एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात आलेला दुरावा सर्वांनाच धक्का देऊन जात आहे.
तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीचा ब्रेकअप का झाला, हाच प्रश्न सध्या चाहते विचारत आहेत.
ही सेलिब्रिटी जोडी आहे, अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Aggarwal) आणि अभिनेता वरुण सूद (Varun Sood) यांची.
दिव्यानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती चेहरा लपवताना दिसत आहे. इथं तिचा फक्त डोळाच दिसत आहे.
नात्यात आलेल्या दुराव्याबाबत लिहितानं दिव्यानं आपण वरुणपासून वेगळं होत असलो तरीही मैत्री कायम राहील असंही म्हटलं आहे. नात्यात दुरावा का आला, यामागचं कारण मात्र तिनं स्पष्ट केलेलं नाही.
वरुणला डेट करण्यापूर्वी दिव्याचं नाव प्रियांक शर्मा याच्याशी जोडलं होतं. हे दोघं रिलेशनशिपमध्येही होते. तिथं वरुणही बेनाफ्शा सूनावाला हिच्यापासून दुरावला होता.
यादरम्यानच दिव्या आणि वरुणनं एक रिअॅलिटी शो स्वीकारला इथंच त्यांचं नातं बहरलं. पुढे ही जोडी लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहू लागली.
वरुणच्या बहिणीच्या लग्नात दिव्याची हजेरी खूप काही सांगून गेली होती. पण, आता मात्र या नात्यात दोघांनीही पाहिलेली स्वप्न अधुरीच राहिल्याचं स्पष्ट होत आहे.