डॉ. हाथी यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहचली 'तारक मेहता'ची संपू्र्ण टीम

गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. 

Updated: Jul 11, 2018, 09:42 AM IST
डॉ. हाथी यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहचली 'तारक मेहता'ची संपू्र्ण टीम title=

मुंबई : गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं खास आहे. डॉ. हंसराज हाथी हे त्यापैकी एक. मात्र ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.  

 कवि कुमार आजाद, Dr Hansraj Hathi, Jethalal, Kavi Kumar Azad, Kavi Kumar Azad death

अभिनयाच्या वेडाने झपाटलेले कवी कुमार आझाद जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या खिशात रुपया नव्हता. घरातील आर्थिक परिस्थितीही ठीक नव्हती. वडीलांना व्यवसायात नुकसान झाले होते. घरातले देखील अभिनय क्षेत्रात जाण्याविरुद्ध होते. त्यामुळे अनेक रात्री त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर काढल्या आहेत.

 कवि कुमार आजाद, Dr Hansraj Hathi, Jethalal, Kavi Kumar Azad, Kavi Kumar Azad death

दिल्लीतून अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत आल्यानंतर पावलोपावली त्यांना संघर्ष करावा लागला.

 कवि कुमार आजाद, Dr Hansraj Hathi, Jethalal, Kavi Kumar Azad, Kavi Kumar Azad death

महिला कॉमेडियन टुनटुन यांनी कवी कुमार यांना पाहताच ते अभिनेते होणार अशी भविष्यवाणी केली होती आणि ती अगदी खरी ठरली.

 कवि कुमार आजाद, Dr Hansraj Hathi, Jethalal, Kavi Kumar Azad, Kavi Kumar Azad death

अभिनयासोबत त्यांना कविता करण्याचीही आवड होती. कवी कुमार यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण जेव्हा त्यांनी तारुण्यात पर्दापण केले तेव्हा त्यांचे शरीर अगदी विचित्र पद्धतीने वाढू लागले आणि बेढब झाले. तरी देखील त्यांनी त्यांच्यातील अभिनयाची आवड मरू दिली नाही.

 कवि कुमार आजाद, Dr Hansraj Hathi, Jethalal, Kavi Kumar Azad, Kavi Kumar Azad death

डॉक्टर हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद मुळचे बिहारमधील सासाराम येथील गौरक्षणी येथे राहणारे आहेत.

 कवि कुमार आजाद, Dr Hansraj Hathi, Jethalal, Kavi Kumar Azad, Kavi Kumar Azad death

आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या कवी कुमार आझाद यांच्यावर १० जुलै रोजी मीरारोड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळेस तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. 

 कवि कुमार आजाद, Dr Hansraj Hathi, Jethalal, Kavi Kumar Azad, Kavi Kumar Azad death