शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला बंगळुरु पोलिसांकडून समन्स, नक्की कारण काय?

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याच्यावर काहि दिवसांपूर्वी ड्रग्ज घेतल्याचा आरोप करण्यात होता.

Updated: Jul 22, 2022, 08:46 PM IST
शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला बंगळुरु पोलिसांकडून समन्स, नक्की कारण काय? title=

मुंबई :  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याच्यावर काहि दिवसांपूर्वी ड्रग्ज घेतल्याचा आरोप करण्यात होता. त्याचबरोबर आता हा अभिनेता पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. वृत्तानुसार, बंगळुरूच्या उलसूर पोलिसांनी सिद्धांत विरोधात नोंदवलेल्या अंमली पदार्थांच्या सेवनप्रकरणी त्याला समन्स बजावले आहेत. 13 जून रोजी बंगळुरूमधील रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. मात्र, एका दिवसात त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

एका वृत्तानुसार, पोलिसांनी रात्रीच्या पार्टीचं  सीसीटीव्ही व्हिडिओ तपासण्यासाठी त्याला बोलावलं होतं. तिथे सिद्धांतसह अन्य चौघांना पकडण्यात आलं. अहवालानुसार, सिद्धांतने पोलिसांना सांगितलं की, त्याला एका माणसाने ड्रिंक आणि दुसऱ्याने सिगारेट दिली होती आणि त्याच्या ड्रिंक किंवा सिगारेटमध्ये ड्रग्स कसे मिसळले होते याची त्याला पूर्णपणे कल्पना नव्हती. दुसरीकडे, उल्सूर पोलिसांनी मंगळवारी सिद्धांतला नोटीस बजावून ७ दिवसांत हजर राहण्यास सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू पोलिसांनी एमजी रोडवर असलेल्या हॉटेलवर छापा टाकला होता.  तेव्हा सिद्धांत आणि इतर अनेक जण तेथे ड्रग्स टेस्ट पॉझिटिव्ह आढळले. त्याचबरोबर एका मुलाखतीत बोलताना शक्ती कपूर यांनी आपला मुलगा ड्रग्ज घेत असल्याचं नाकारलं होतं. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, 13 जून रोजी सिद्धांत मुंबईहून बेंगळुरूला एका रेव्ह पार्टीसाठी गेला होता. कपूर कुटुंबीयांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती.

त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 'भूल भुलैया', 'भागम भाग', 'चुप चुपके' आणि 'ढोल' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 2013 मध्ये त्याने संजय गुप्ता यांच्या 'शूटआउट अॅट वडाळा' या चित्रपटात काम केलं होतं. यानंतर तो 'अग्ली' आणि 'भौकाल' या वेबसिरीजमध्येही दिसला.