एकता कपूरच्या 'हक से'चा दूसरा ट्रेलर लॉन्च

Updated: Mar 30, 2018, 08:29 AM IST
एकता कपूरच्या  'हक से'चा दूसरा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : एकता कपूर ने अल्ट बालाजी प्रोडक्शनच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर कित्येक शो लॉन्च केले आहेत. ज्या प्रेक्षकांची पसंतीही मिळत आहे. नुकताच एकताने राजीव खंडेलवाल आणि सुरवीन चावला काम करत असलेला शो 'हक से' लॉन्च केलाय.

'हक से' चा ट्रेलर लॉन्च 

 येणाऱ्या दिवसात एकता कपूर अनेक शो आणण्याच्या तयारीत आहे.  'हक से' हा यातला छोटासा हिस्सा आहे. हा शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. या शोच्या सुरूवातीला एकता कपूरने ट्रेलर लॉन्च केला होता. आता एकताने याचा दुसरा ट्रेलरही लॉन्च केलाय. 

काय आहे कहाणी ?

या शोची कहाणी लिटिल वुमेन साहित्यातून प्रेरित आहे. काश्मीरच्या मिर्झा परिवाराच्या भोवताली ही कहाणी फिरते.

या परिवारात एक आई आणि ४ बहिणी असून आपल्या आयुष्यात काहीतरी मोठ करण्याच स्वप्न बघताना दिसत आहेत. एक वेळ अशी येते की घडामोडी बिघडतात. त्यांच्या आईला घरातील महत्त्वाचे सामान विकण्याची वेळ येते.