मुलीचं लग्न हे प्रत्येक आई-वडिलांसाठी एक चिंतेची बाब असते. कारण लेकीने सासरी जाऊन स्वतःची जागा निर्माण करणे. सगळ्यांचं मन जिंकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जे सुख, समाधान तिला माहेरी मिळालं तेच सासरी मिळेल का? हा प्रश्न लेकीच्या पालकांना सतावत असतो.
अशावेळी पालकांनी लेकीच्या लग्नानंतर पाठवणीच्यावेळी काही खास गोष्टी करणे आवश्यक असते. ज्यामुळे लेक सासरी आनंदात नांदेल एवढंच नव्हे तर सासरची मंडळी तिला माहेरच्या मंडळीहून अधिक प्रेम देतील. यासाठी पालकांनी पाठवणीच्या वेळी खास उपाय करणे गरजेचे आहे. यामुळे मुलगी सासरी कायम सुखात आणि आनंदात राहील.