Rohit Shetty Hospitalised: दिग्दर्शक रोहित शेट्टीचा शुटिंगच्या सेटवर अपघात, रुग्णालयात दाखल

आताची मोठी बातमी, दिग्दर्शक रोहित शेट्टीचा शुटिंगाच्या सेटवर अपघात, कारचा सीन चित्रित करताना झाला अपघता, रुग्णलयात केलं दाखल  

Updated: Jan 7, 2023, 05:17 PM IST
Rohit Shetty Hospitalised: दिग्दर्शक रोहित शेट्टीचा शुटिंगच्या सेटवर अपघात, रुग्णालयात दाखल title=

Rohit Shetty News: बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी  (Rohit Shetty) सघ्या आपली वेब सीरिज (Web Sereis) 'इंडियन पोलीस फोर्स'च्या (Indian Police Force) शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या शुटिंगच्या सेटवरुन मोठी बातमी समोर आली आहे. शुटिंगदरम्यान रोहित शेट्टी यांना दुखापत (Rohit Shetty Injured) झाली असून त्यांना रुग्णालयात (Rohit Shetty hospitalised) दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनसुार एका कारचा सीन चित्रित करताना रोहित शेट्टी यांच्या हाताला दुखापत झाली, त्यानंतर त्यांना हैदराबादमधल्या कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

वेब सीरिजचं शुटिंग
रोहित शेट्टी सध्या एका वेब सीरिजवर काम करत असून या सीरिजचं नाव इंडियन पोलीस फोर्स असं आहे. रोहित शेट्टी पहिल्यांदाच वेब सीरिजचं दिग्दर्शन करतायत. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी यांच्यासारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजचा फर्स्ट लूकही जारी करण्यात आला आहे. या वेब सीरिजचं शुटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. या दरम्यानच रोहित शेट्टी यांच्या हाताला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार एक छोटीसी शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

या वर्षी रोहित शेट्टींचे अनेक चित्रपट
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' (circus) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर (Box Office) तो दणक्यात आपटला. त्यानंतर या वर्षी रोहित शेट्टी यांचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यात सिंघम 3, सूर्यवंशी 2 आण गोलमाल 5 सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय इंडिय पोलीस फोर्स ही वेब सीरिजही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी यांची गोलमाल चित्रपटांची सीरिज चांगली हिट ठरली आहे. तर सिंघमचे दोन्ही चित्रपटही सुपरहिट झालेत. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या सूर्यवंशी चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता.