Nita Ambani Dance at Anant-Radhika Pre-Wedding : गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंटचा (Radhika Marchent) प्री-वेडिंग सोहळा रंगतोय. 1 मार्च ते 3 मार्चदरम्यान हा सोहळा सुरु असणार आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी झाले आहेत. या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी डान्सची तालीम (Dance Video) करताना दिसत आहेत. या व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंती मिळतेय.
जामनगरमध्ये 'तारे जमीन पर'
अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. या सोहळ्यासाठी आमिर खान, सलमान खान, शाहुरख खान, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अनन्या पांडे, शनाया कपूर जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना भारतात आली आहे. या सोहळ्यासाठी रिहानाने करोडो रुपये चार्ज केलं आहे.
प्री वेडिंग सोहळ्यात म्यूझिकल नाईटचंही आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी डान्स करणार आहेत. या डान्सच्या तालीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज कपूर यांच्या 'श्री 420' चित्रपटातील 'प्यार हुआ इकरार हुआ है' या गाण्यावर हे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
Anant Ambani आणि Radhika Merchant चं लग्न
अनंत आणि राधिका जुलै 2024 लग्न करत आहेत. याआधी गुजरातच्या जामनगरमध्ये दोघांचा प्री-वेडिंग सोहळा रंगतोय. सोशल मीडियावर या सोहळ्याचं इन्व्हिटेशन कार्डही व्हायरल झालं होतं. या सोहळ्यासाठी एलिजेंट कॉकटेल थीमवर ड्रेस कोड ठेवण्यात आलंय.
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.