IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 (IPL 2025) साठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन पार पडणार असून पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला मोठी बोली लावून विकत घेतले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या माजी गोलंदाजाला खरेदी करण्यासाठी पूर्ण जोर लावला मात्र त्यांच्या नाका खालून राजस्थानने जोफ्रा आर्चरवर (Jofra Archer) 12.50 कोटींची बोली लावली आणि आपल्या संघात घेतले.
जोफ्रा आर्चरने 2018 मध्ये राजस्थान रॉयल्सकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. मात्र इंग्लंडचा हा वेगवान गोलंदाज काही काळ दुखापतीने त्रस्त असल्याने आयपीएलमधील त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ उतार आले. आर्चरच्या दुखापतीमुळे राजस्थानने त्याला रिलीज केले होते, पण पुन्हा संधी मिळाल्यावर राजस्थानने जोफ्रा आर्चरला संधी दिली आहे.
जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त तीन सीजन खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 35 सामने खेळले ज्यात त्याने 45 विकेट्स घेतल्या. आयपीएलमधील त्याची गोलंदाजी पाहिली तर ती आश्चर्यकारक होती. त्यामुळेच राजस्थान संघाने त्याला पुन्हा मोठ्या रकमेत खरेदी केले आहे.
First one in this IPL cycle. Special! pic.twitter.com/K3LLNgR69r
— Rajasthan Royals (rajasthanroyals) November 24, 2024
From JofraArcher to the Royals fam, once again. Watch pic.twitter.com/R8zfE8HeRz
— Rajasthan Royals (rajasthanroyals) November 24, 2024
राजस्थान रॉयल्सशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. जसप्रीत आयपीएल 2023 मध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली. त्यामुळे वेगवान गोलंदाज असलेल्या आर्चरला खरेदी करण्यासाठी मुंबईने जोर लावला परंतु यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आणि जोफ्रा आर्चरला विकेट घेतले.
जोफ्रा आर्चरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, त्याने इंग्लंडसाठी 13 टेस्ट , 27 वनडे आणि 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आर्चरच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 42 विकेट्स आहेत, तर वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 47 विकेट आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याने 35 विकेट घेतल्या आहेत.