Suhana Khan ने शेअर केला ग्लॅमरस फोटो, पण शाहरुखच्या कमेंटने झाली पोलखोल

क्या यार पापा! Suhana Khan ला अतिउत्साह नडला; शाहरुखनंच केली पोलखोल, सुहानाच्या फोटोवर केलेल्या कमेंटची सोशल मीडियावर चर्चा

Updated: Jan 24, 2023, 04:51 PM IST
Suhana Khan ने शेअर केला ग्लॅमरस फोटो, पण शाहरुखच्या कमेंटने झाली पोलखोल title=

Shah Rukh Khan Comment on Suhana Khan Photos: बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) अॅक्शन आणि रोमँटिक अभिनयासाठी ओळखला जातो. पण त्याचबरोबर त्याचा हजरजबाबीपणाही लोकांना आवडतो. याची अनेक उदाहरणं आहेत, पण आता त्याच्या मुलीलाही याचा अनुभव आला आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू (Bollywood Debut) करणार आहे. सुहाना सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

शेअर केला ग्लॅमरस फोटो
सुहाना खानने नुकत्याच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Suhana Khan Instagram) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुहान खुपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सुहानाचा हा फोटो खुपच सुंदर आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पण एका कमेंटने युजर्सचं लक्ष वेधलं आहे. ही कमेंट आहे सुहानाचे वडिल शाहरुख खानची. सुहानाच्या फोटोपेक्षा शाहरुख खानच्या या कमेंटचीच जास्त चर्चा होतेय. 

सुहानाने शेअर केले तीन फोटो
सुहाना खानने आपले तीन फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यापैपीक पहिल्या फोटोत सुहानाने डीप वी-नेक ब्लॅक गाऊन परिधान करत आपला फिगर प्लॉन्ट केला आहे. तर दुसऱ्या फोटोत सुहानाने पिंक कलरचा ड्रेस परिधान केला आहे, या फोटोत ती आई गौरी खान आणि अभिनेत्री शनाया कपूरसोबत दिसतेय. तिसऱ्या फोटोत तीने कॅमेरासमोर सुंदर पोझ दिली आहे. 

शाहरुख खानची कमेंट वेधतेय लक्ष
सुहाना खानने फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही वेळातच कमेंटचा पाऊस सुरु झाला आहे. पण चर्चा होतेय ती सुहानाचे वडिल शाहरुख खानच्या पोस्टची. या पोस्टमध्ये शाहरुख खानने सुहानाची पोलखोल केली आहे. आपल्या पोस्टमध्ये शाहरुखने म्हटलंय, 'माझी मुलगी खूपच सुंदर दिसत आहे, घरात दिवसभर ती पायजम्यावर फिरत असते, पण तिचा लूक किती वेगळा आहे'. शाहरुखच्या या पोस्टला जवळपास 1,600 लाइक मिळाले आहेत. वडिलांच्या कमेंटवर सुहानानेही रिप्लाय करत थँक्स म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

चाहत्यांना 'पठाण'ची उत्सुकता
बहुचर्चित पठाण हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित होणार आहे. तब्बल चार वर्षांनी शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. या चित्रपटाली 'बेशरम रंग' या गाण्यावर प्रचंड वाद निर्माण झाला होता. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या गाण्यात परिघान केलेल्या भगव्या बिकनीवर हिंदु संघटनाने आक्षेप घेतला होता. पण याचा फारसा परिणाम चित्रपटाच्या टिझरवर दिसला नाही. पठाण चित्रपटाच्या टिझरला करोडो व्ह्यूज मिळाले, आता सर्वांना उत्सुकता आहे ती चित्रपटाच्या प्रदर्शनाची.