दाक्षिणात्य अभिनेत्री ईशान्या महेश्वरीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

ईशान्याने २०१५ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

Updated: Jun 5, 2019, 08:52 PM IST
दाक्षिणात्य अभिनेत्री ईशान्या महेश्वरीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री title=

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नाव कमविल्यानंतर आता अभिनेत्री ईशान्या महेश्वरी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ईशान्या लवकरच 'क्या मस्ती क्या धूम' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. चित्रपटात ईशान्यासह करण जौहरच्या 'स्टूडंन्ट ऑफ द ईयर २'मधून पदार्पण करणारा अभिनेता अभिषेक बजाज आणि 'सुलतान' फेम अभिनेता अनंत शर्मा देखील भूमिका साकारणार आहेत. 

'क्या मस्ती क्या धूम' या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत सिंह करणार आहेत. ईशान्याने २०१५ मध्ये 'राजू गुरु गांधी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ईशान्याने २०१६ मध्ये 'पैगल जाक्कीर्थी या चित्रपटातही भूमिका साकारली होती.

ईशान्याने दिग्दर्शक चंद्रकांत सिंह यांचे या चित्रपटात काम करण्यासाठी दाखवलेल्या विश्वासासाठी आभार मानले आहेत. या चित्रपटातून एक नवीन अनुभव मिळत असल्याचं तिने म्हटलंय. आगामी 'क्या मस्ती क्या धूम' चित्रपटाबद्दल अतिशय उत्साही असल्याचंही तिने सांगितलं.

ईशान्या सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 'क्या मस्ती क्या धूम' चित्रपटातून ईशान्यासह जॉनी लीवर, हेमंत राज आणि विजय राज यांसारखे ज्येष्ठ कलाकारही प्रेक्षकांच्या भेटील येणार आहेत.