शाहिदच्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावरुन मिशा आणि झेन या दोघांनाही चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते.

Updated: Jun 5, 2019, 08:26 PM IST
शाहिदच्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची मुलं मिशा आणि झेन हे दोघेही बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असणाऱ्या स्टार किड्सपैकी एक आहेत. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत गेल्या वर्षी दुसऱ्यांदा आई-वडिल बनले. मीरा नेहमीच मिशा आणि झैनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

मीराने इन्स्टाग्रामवर आपल्या दोन्ही मुलांचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये मिशा आणि झेन फुलासोबत खेळताना दिसत आहेत. त्या फोटोला मीराने मिशा आणि झैन यांच्यातील संभाषण कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. मिशाने या फोटोमध्ये निळ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे तर झेनने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

सोशल मीडियावरुन मिशा आणि झेनन या दोघांनाही चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते. मिरा नेहमीच तिच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसते. ७ जुलै २०१५ मध्ये शाहिद-मीरा विवाह बंधनात बांधले गेले. 

सध्या शाहिद कपूर त्याच्या आगामी 'कबीर सिंह' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'कबीर सिंह'मधून शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटचा 'कबीर सिंह' हा हिंदी रिमेक आहे. 'कबीर सिंह' येत्या २१ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.