अभिनेत्री रिंकूकडून एक्स पतीचा विश्वासघात; 15 वर्षानंतर तुटलं नातं म्हणाली, 'मला एकटेपण...'

कलाकार जितके चर्चेत त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे असतात तितकेच चर्चेत ते त्यांच्या प्रोफशल लाईफमुळे चर्चेत असतात.

Updated: Jan 12, 2024, 01:00 PM IST
अभिनेत्री रिंकूकडून एक्स पतीचा विश्वासघात; 15 वर्षानंतर तुटलं नातं म्हणाली, 'मला एकटेपण...' title=

मुंबई : बिग बॉस १७ ची कंटेस्टंट रिंकू धवनचा शोमधील प्रवास इथेच संपला आहे. शोमध्ये तिची मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमारसोबत खूप चांगलं बॉन्डिंग दाखवलं आहे. अभिनेत्रीने शोमधून बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपल्या एक्स पती किरण करमाकरबद्दल वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीने कहानी घर घर की मध्ये सावली ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेमधून ती घरा-घरात पोहचली. प्रसिद्ध असलेली रिंकू धवन ही बिग बॉस 17 च्या बोल्ड आणि सुंदर स्पर्धकांपैकी एक आहे. ही टीव्ही अभिनेत्री तिच्या आयुष्यात नेहमीच खूप चर्चेत असते. एका भूमिकेसाठी तिने मुंडणही केलं होतं. रिंकूने आपल्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेत्रीने ऑनस्क्रीन भावाशी केलं लग्न?
 रिंकू नेहमीच तिच्या प्रोफेशनल आयुष्या ईतकी पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. 'घर घर की कहानी' मालिकेमध्ये भावा-बहिणीच्या भूमिकेत दिसणारे किरण करमकर आणि रिंकू एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2002 मध्ये त्यांनी लग्न केलं. रिंकू आणि किरण यांना इशान नावाचा मुलगा आहे. सगळं काही सुरुळीत सुरु असताना मात्र, 15 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 

अभिनेत्रीने सांगितलं की, मला नाही माहिती की आमच्या नात्यात कधी आणि केव्हा दुरावा आला. तिने असंही सांगितलं की, मला वाटतं की, आमच्या नात्यातलं प्रेम संपल होतं. मला किरणसोबत बोलायचं होतं मात्र त्याने माझ्यासोबत बोलणं बंदच केलं होतं. मी त्याला सांगू इच्छित होते की माझा दिवस कसा गेला मात्र तो बाहेरुन आल्यावर लगेच झोपायचा त्याने माझ्याशी संवाद साधणं बंद केलं होतं. आमच्यातला दुरावा वाढत चालला होता. मला खूप एकटं वाटू लागलं होतं. 

यानंतर मी अशा व्यक्तीसोबत कनेक्ट झाली जो मला समजून घ्यायचा. माझ्या फिलींग्सला समजायचा. ते एक इमोशनल कनेक्शन होतं.  मी त्याच्याशी फक्त बोलायची आणि तो ऐकून घ्यायचा. अभिनेत्री पुढे असंही म्हणाली की, मला ते टिकवायचं होतं यामचं कारण म्हणजे माझा मुलगा.  एक दिवशी किरणने तो मेल पाहिला ज्यामध्ये मी माझ्या मनातल्या गोष्टी त्या खास व्यक्तीसाठी लिहील्या होत्या. यानंतर किरणने सगळ्यांसमोर खूप वाद केला. यानंतर मी सेम बिल्डिंगमध्ये वेग-वेगळा फ्लॅट घेवून राहू लागले. जेणेकरुन मी माझ्या मुला जवळ राहू शकेन. यानंतर आम्ही दोघंही वेगळे झालो. एका मुलासाठी त्याचे पॅरेंन्ट्स वेगळं होणं खू कठिण असतं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x